Donald Trump on Strait of Hormuz: इराणसोबत सुरू असलेल्या तीव्र लष्करी संघर्षानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक अत्यंत मोठा आणि खळबळजनक निर्णय घेतला आहे. हॉर्मुझ सामुद्रधुनी या अत्यंत महत्त्वाच्या सागरी व्यापारी मार्गावर आता अमेरिका ताबा मिळवणार असल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. वॉशिंग्टन आता या संपूर्ण सागरी क्षेत्राच्या सुरक्षेची जिम्मेदारी स्वतःकडे घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या ऐतिहासिक निर्णयानंतर ट्रम्प यांनी नवीन कर रचनेचीही घोषणा केली आहे. या सागरी मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व प्रकारच्या मालवाहू जहाजांमधील मालावर आता अमेरिकेकडून 20 टक्के खर्चाची वसुली केली जाणार आहे.
इराणची नाकेबंदी सुरू; इतर देशांसाठी मार्ग राहणार मोकळा
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया पोस्टद्वारे या नवीन नियमांची सविस्तर माहिती दिली आहे.
हॉर्मुझ सामुद्रधुनी इराण असो वा नसो, पूर्णपणे खुलीच राहील. अमेरिका येथे अधिकृतपणे नाकेबंदी लागू करत आहे. या नाकेबंदीचे नाव इराणी नाकेबंदी यासाठी ठेवण्यात आले आहे कारण हे निर्बंध केवळ इराणची जहाजे किंवा त्यांच्या ग्राहकांना या सागरी क्षेत्रात येण्या-जाण्यापासून रोखण्यासाठी आहेत. इराण वगळता जगातील इतर सर्व देशांना या सागरी मार्गाचा वापर करण्याचा पूर्ण अधिकार असेल.
अमेरिका आता अधिकृतपणे या क्षेत्राचा मुख्य रक्षक म्हणून काम करेल. या अत्यंत संवेदनशील भागाला सुरक्षा पुरवण्यासाठी जो काही खर्च येईल, तो खर्च भागवण्यासाठी या मार्गाचा वापर करणाऱ्या देशांकडून 20 टक्के दराने रक्कम वसूल केली जाईल आणि ही प्रक्रिया तात्काळ प्रभावाने लागू केली जात आहे.
जागतिक बाजारपेठेसाठी हा मार्ग का आहे अत्यंत महत्त्वाचा?
हॉर्मुझ सामुद्रधुनी हा जागतिक अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा मानला जातो.
हा सागरी मार्ग पर्शियन आखात आणि ओमानच्या आखाताला एकमेकांशी जोडतो. जगातील एकूण खनिज तेल आणि लिक्विफाइड नॅचरल गॅसच्या एकूण वाहतुकीपैकी तब्बल 1 तृतीयांश म्हणजेच 1/5 भाग याच अरुंद मार्गावरून वाहून नेला जातो.
या अरुंद सागरी मार्गावरील वाहतुकीत किंचितही अडथळा निर्माण झाल्यास त्याचा थेट आणि तात्काळ परिणाम जागतिक ऊर्जा बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर होतो. यापूर्वी फॉक्स न्यूजशी फोनवर बोलताना ट्रम्प यांनी गंमतीने या मार्गाला अमेरिकेचा रक्षक देवदूत असे नाव दिले होते.
इराणचा अमेरिकेला थेट इशारा; सहकार्य करणाऱ्या देशांविरोधात युद्धाची धमकी
पंतप्रधान डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दाव्याला इराणच्या सर्वोच्च लष्करी कमांडने तीव्र विरोध केला असून तो पूर्णपणे फेटाळून लावला आहे. इराणच्या लष्कराने स्पष्ट केले आहे की, ते अमेरिकेला या धोरणात्मक सागरी मार्गात हस्तक्षेप करण्याची परवानगी देणार नाहीत. इराणी परवानगीशिवाय अमेरिकन सैन्याने येथून जाण्याचा प्रयत्न केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल.
इराणने या परिसरातील प्रादेशिक सरकारांनाही कडक इशारा दिला आहे. या मोहिमेत जर कोणत्याही देशाने अमेरिकेला सहकार्य केले, तर ते इराणविरुद्धचे थेट युद्ध मानले जाईल. जर हा संघर्ष वाढला तर तो संपूर्ण मध्य पूर्व प्रदेशात पसरू शकतो आणि त्याची संपूर्ण जबाबदारी अमेरिका आणि तिच्या मित्र राष्ट्रांची असेल, असे इराणने म्हटले आहे.
चर्चेदरम्यान इराणकडून वेळकाढूपणा; ट्रम्प यांचा गंभीर आरोप
फॉक्स न्यूजच्या मुलाखतीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर शांतता चर्चेमध्ये वारंवार भूमिका बदलल्याचा आणि वेळकाढूपणा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. करारावर एकमत झाल्यानंतरही तेहरान जाणीवपूर्वक चर्चा लांबवत असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
ते म्हणाले की, काल 11 तास चाललेल्या प्रदीर्घ बैठकीत सर्व मुद्द्यांवर एकमत झाले होते. मात्र, इराणी प्रतिनिधी खोलीबाहेर पडले आणि त्यांनी फोन करून पुन्हा काही बदल करण्याची मागणी केली. ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, अमेरिका आता कोणत्याही बदलांना मान्यता देणार नाही. दरम्यान, गेल्या काही दिवसांत दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये भीषण क्षेपणास्त्र आणि ड्रोनचे हल्ले झाले असून इराणने यापूर्वीच या सामुद्रधुनीवर आपला ताबा असल्याचा दावा केला होता.











