Home / महाराष्ट्र / NCP Internal Dispute: सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीला न्यायालयात आव्हान? पक्षांतर्गत वादावर सुनील तटकरे यांनी सोडले मौन

NCP Internal Dispute: सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीला न्यायालयात आव्हान? पक्षांतर्गत वादावर सुनील तटकरे यांनी सोडले मौन

NCP Internal Dispute: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांच्या झालेल्या निवडीवरून पक्षांतर्गत मोठा वाद निर्माण झाला आहे. पक्षाचे...

By: Team Navakal
NCP Internal Dispute: सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीला न्यायालयात आव्हान? पक्षांतर्गत वादावर सुनील तटकरे यांनी सोडले मौन
Social + WhatsApp CTA

NCP Internal Dispute: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांच्या झालेल्या निवडीवरून पक्षांतर्गत मोठा वाद निर्माण झाला आहे. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीला आक्षेप घेत कायदेशीर नोटीस बजावली आहे. या अनपेक्षित नोटिसीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. एकीकडे सत्तेच्या समीकरणांची चर्चा सुरू असताना, दुसरीकडे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही सुरळीत नसल्याचे या घडामोडीवरून समोर आले आहे.

नोटिसीमध्ये कोणतेही तथ्य नाही; सुनील तटकरे यांचा दावा

या कायदेशीर नोटिसीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अधिकृत भूमिका स्पष्ट केली असून पक्षाची बाजू मांडली आहे. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड पूर्णपणे नियमांनुसार आणि सर्व नेत्यांनी एकत्र बसून घेतलेल्या निर्णयानुसारच झाली आहे. त्यामुळे या नोटिसीमध्ये कायदेशीरदृष्ट्या कोणतेही तथ्य नाही.

नोटिसीला उत्तर देण्यापूर्वी पक्ष कायदेशीर तज्ज्ञांचा सल्ला घेईल, तसेच या संपूर्ण प्रकरणाची तांत्रिक माहिती घेऊन पुढील पावले उचलली जातील. संबंधित व्यक्तीशी (सच्चिदानंद सिंह) माझा थेट संवाद झालेला नाही. दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी त्यांचा संपर्क झाला असल्यास मला माहिती नाही. मात्र, संपूर्ण पक्ष एकसंघपणे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे, असे ते म्हणाले.

आमचा पक्ष लोकशाही मार्गाने चालतो, त्यामुळे कोणाही नेत्याला अशा प्रकारे अध्यक्ष निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण आठवडाभर पक्षातर्फे विविध समाजोपयोगी उपक्रम आणि कामे हाती घेतली जाणार असल्याची माहितीही तटकरे यांनी दिली.

अर्थखाते राष्ट्रवादीकडे घेणार; मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट

सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या राज्याच्या अर्थखात्याबाबत सुनील तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेले हे महत्त्वाचे खाते परत मिळवण्यासाठी पक्षाचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. गेल्या काही दिवसांपासून विधानसभेचे अधिवेशन सुरू असल्याने यावर चर्चा होऊ शकली नाही, परंतु मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन हा प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावला जाईल, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.

काय म्हणाले आक्षेप घेणारे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह?

सुनेत्रा पवार यांची 26 फेब्रुवारी रोजी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड कायदेशीरदृष्ट्या अवैध असल्याचा दावा करत सच्चिदानंद सिंह यांनी पक्षाला जाब विचारला आहे.

या नोटिसीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, सुनेत्रा पवार यांच्या निवड प्रक्रियेमध्ये काही कायदेशीर आणि तांत्रिक त्रुटी राहिल्या आहेत, त्या दूर करणे पक्षाच्या हिताचे आहे. या कायदेशीर नोटिसीच्या मागे कोणताही राजकीय हेतू अथवा कट नसून, केवळ नैसर्गिक न्यायाच्या भूमिकेतून मी हा आग्रह धरला आहे.

    Web Title:
    संबंधित बातम्या