Home / लेख / Diabetes Brain Damage: सावधान! फक्त किडनी किंवा हार्ट नव्हे, तर तुमच्या मेंदूचाही गेम करू शकतो मधुमेह; वेळीच ओळखा ‘हे’ 6 मोठे धोके

Diabetes Brain Damage: सावधान! फक्त किडनी किंवा हार्ट नव्हे, तर तुमच्या मेंदूचाही गेम करू शकतो मधुमेह; वेळीच ओळखा ‘हे’ 6 मोठे धोके

Diabetes Brain Damage: रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित होणे म्हणजे केवळ थकवा येणे किंवा गोड खाण्यावर बंदी येणे नव्हे, तर तो...

By: Team Navakal
Diabetes Brain Damage: सावधान! फक्त किडनी किंवा हार्ट नव्हे, तर तुमच्या मेंदूचाही गेम करू शकतो मधुमेह; वेळीच ओळखा 'हे' 6 मोठे धोके
Social + WhatsApp CTA

Diabetes Brain Damage: रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित होणे म्हणजे केवळ थकवा येणे किंवा गोड खाण्यावर बंदी येणे नव्हे, तर तो थेट मेंदूच्या आरोग्याशी जोडलेला एक अत्यंत गंभीर तांत्रिक बिघाड आहे. वैद्यकीय भाषेत ज्याला आपण सायलेंट किलर म्हणतो, तो मधुमेह तुमच्या विचार करण्याच्या आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर हळूहळू पण अत्यंत खोलवर परिणाम करतो.

शरीरातील ग्लुकोजची पातळी सतत अस्थिर राहिल्याने मेंदूच्या अंतर्गत पेशींचे कार्य मंदावते. जर याकडे सुरुवातीलाच लक्ष दिले नाही, तर भविष्यात मानसिक संतुलन बिघडण्यासोबतच अनेक गंभीर न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवू शकतात. साखरेच्या अतिप्रमाणामुळे मेंदूला कोणते धोके निर्माण होतात, याचा सविस्तर आढावा खालीलप्रमाणे आहे.

मधुमेहामुळे मेंदूला होणारे 6 गंभीर धोके

हाय ब्लड शुगरमुळे मेंदूच्या कार्यपद्धतीवर आणि नसांवर वेगवेगळ्या प्रकारे नकारात्मक परिणाम होतो:

  • स्ट्रोकची भीती: मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तवाहिन्या कडक आणि अरुंद होतात. यामुळे मेंदूकडे होणारा रक्तप्रवाह अचानक थांबू शकतो, जो पक्षाघाताचा सर्वात मोठा कारण ठरतो. यामुळे कायमचे अपंगत्व येण्याचा धोका असतो.
  • उदासीनता आणि चिंता: साखरेच्या पातळीत सतत बदल होत राहिल्याने मूड स्विंग्स, चिडचिडेपणा, मानसिक ताण आणि झोप न याणे अशा समस्या सुरू होतात. याचे रूपांतर पुढे चालून गंभीर डिप्रेशनमध्ये होते.
  • स्मरणशक्ती कमकुवत होणे: शरीरात वयोगटानुसार दीर्घकाळ साखर वाढलेली राहिल्यास मेंदूतील बारीक रक्तवाहिन्यांचे नुकसान होते. परिणामी, मेंदूला मिळणारा ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा पुरवठा कमी होतो. यामुळे व्यक्ती छोट्या-छॉटी कामे किंवा गोष्टी विसरू लागते.
  • मानसिक गोंधळ : साखरेचे प्रमाण अचानक खूप वाढल्याने किंवा कमी झाल्याने मेंदू बधीर होतो. या स्थितीत रुग्णाला सतत गोंधळल्यासारखे वाटते आणि कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे कठीण होते.
  • मज्जातंतूंचे नुकसान: साखरेवर नियंत्रण नसल्यास मज्जातंतूंचे जे नुकसान होते, त्याला डायबिटिक न्यूरोपॅथी म्हणतात. याचा त्रास मुख्यत्वे हात-पायांना होतो, पण यामुळे मेंदूकडून मिळणारे सिग्नल्स देखील बिघडतात. त्यामुळे शरीराचा समतोल जाणे किंवा चक्कर येणे अशा समस्या वाढतात.
  • स्मरणभ्रंश आणि अल्झायमरचा धोका: अनेक संशोधनातून असे समोर आले आहे की, सामान्य लोकांच्या तुलनेत मधुमेह असलेल्या रुग्णांना विसरभोळेपणाचे गंभीर आजार होण्याचा धोका खूप जास्त असतो. वाढलेली साखर मेंदूच्या पेशी नष्ट करते आणि न्यूरॉन्स मधील संपर्क विस्कळीत करते.

मेंदूला सुरक्षित ठेवण्यासाठी 6 सोपे आणि प्रभावी उपाय

तुमच्या दैनंदिन जीवनशैलीत काही छोटे बदल करून तुम्ही मेंदूचे आरोग्य नेहमी निरोगी ठेवू शकता:

  • व्यसनांपासून दूर राहा: धूम्रपान आणि मद्यपानासारख्या घातक सवयींपासून स्वतःला पूर्णपणे लांब ठेवा.
  • नियमित तपासणी: आपल्या साखरेची पातळी वेळोवेळी तपासा आणि डॉक्टरांनी दिलेली औषधे न चुकता वेळेवर घ्या.
  • गोड पदार्थांपासून अंतर: आहारात साखर, मैद्याचे पदार्थ आणि जंक फूडचे प्रमाण पूर्णपणे कमी करा.
  • पोषक आहाराचा वापर: जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, फायबर आणि प्रोटीनयुक्त घटकांचा जास्तीत जास्त समावेश करा.
  • शारीरिक व्यायाम: रोज किमान 30 मिनिटे चालणे, योगासने किंवा हलका व्यायाम करण्याची सवय लावा.
  • मानसिक तणावाचे व्यवस्थापन: ताणतणाव स्वतःवर हावी होऊ देऊ नका आणि दररोज रात्री 7 ते 8 तासांची गाढ झोप घ्या.
Web Title:
Topics:
संबंधित बातम्या