Home / महाराष्ट्र / Ketan Agrawal Pune Lohagad Case : पहिले सिया बाहेर पडली अन् लगेच त्याच रुममध्ये दुसरी मैत्रीण गेली; केतन अग्रवाल प्रकरणात चेतनच्या हॉटेलमधील काळ्या कृत्यांचा पर्दाफाश..

Ketan Agrawal Pune Lohagad Case : पहिले सिया बाहेर पडली अन् लगेच त्याच रुममध्ये दुसरी मैत्रीण गेली; केतन अग्रवाल प्रकरणात चेतनच्या हॉटेलमधील काळ्या कृत्यांचा पर्दाफाश..

Ketan Agrawal Pune Lohagad Case : पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ला परिसरात घडलेल्या बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणाने (Ketan Agrawal Pune...

By: Team Navakal
Ketan Agrawal Pune Lohagad Case
Social + WhatsApp CTA

Ketan Agrawal Pune Lohagad Case : पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ला परिसरात घडलेल्या बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणाने (Ketan Agrawal Pune Lohagad Case) आता अत्यंत धक्कादायक आणि थरारक वळण घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सिया गोयल (Siya Goyal) आणि चेतन चौधरी (Chetan Choudhari) यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. काल (१६ जुलै) वडगाव मावळ न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या प्रकरणाची महत्त्वाची सुनावणी पार पडली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने दोन्ही संशयित आरोपींची रवानगी पुढील १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश दिले आहेत. पुणे पोलिसांनी या प्रकरणात केलेल्या अत्यंत सखोल आणि कौतुकास्पद तपासामुळे हत्येच्या कटाची नवनवीन आणि हादरवून टाकणारी माहिती समोर येत आहे.

आधी शोधला होता ‘कॉन्ट्रॅक्ट किलर’; ऐनवेळी माघार घेणारा ठरार प्रमुख साक्षीदार
पुणे पोलिसांच्या तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, केतन अग्रवालची हत्या स्वतः करण्यापूर्वी सिया आणि चेतन यांनी त्याची सुपारी देण्याचा कट रचला होता. यासाठी त्यांनी एका व्यावसायिक ‘कॉन्ट्रॅक्ट किलर’शी (Contract Killer) संपर्क साधला होता. या संदर्भात पुणे येथील एका कॅफेमध्ये सिया, चेतन आणि त्या कॉन्ट्रॅक्ट किलरची प्रत्यक्ष बैठकही झाली होती. या बैठकीत त्यांनी केतनच्या हत्येचा कट आणि त्याची वैयक्तिक माहिती त्या मारेकऱ्याला दिली. मात्र, केतन अग्रवालची कौटुंबिक व सामाजिक पार्श्वभूमी आणि त्याची माहिती समजताच, हत्येला होकार देणाऱ्या त्या कॉन्ट्रॅक्ट किलरने ऐनवेळी या गुन्ह्यातून माघार घेतली व काम करण्यास नकार दिला.

आता पोलिसांच्या हाती लागलेली हीच व्यक्ती या खटल्यात सिया आणि चेतन यांच्याविरोधात न्यायालयातील सर्वात प्रमुख आणि सरकारी साक्षीदार (Star Witness) ठरण्याची दाट शक्यता आहे. पोलिसांनी संशयित आरोपी आणि त्या व्यक्तीची भेट झालेल्या कॅफेचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज जप्त केले असून, त्याद्वारे पुढील तांत्रिक तपास वेगाने सुरू केला आहे.

सीसीटीव्ही नसलेली जागा निवडली; पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी पाहिले जपानी व्हिडिओ
केतन अग्रवालला ट्रेकिंगची (Trekking) प्रचंड आवड होती. याच आवडीचा गैरफायदा घेऊन त्याला लोहगड किल्ल्यावर नेणे आणि तिथून त्याला दरीत ढकलून देणे सोपे जाईल, हे मुख्य सूत्रधार सिया गोयल हिने आधीच हेरले होते. आपल्या गुन्हेगारी कटाची अंमलबजावणी करण्यासाठी सियाने लोहगडावरील अशा एका निर्जन जागेची निवड केली होती, जिथे एकही सीसीटीव्ही कॅमेरा नसेल आणि सामान्य पर्यटक किंवा ट्रेकर्स सहसा तिथे फिरकणार नाहीत, याची तिने पूर्ण खात्री करून घेतली होती.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, हत्येनंतर पोलिसांच्या चौकशीला सामोरे जाताना पूर्णपणे शांत कसे राहायचे, पोलिसांना संशय येऊ नये म्हणून प्रश्नांची उत्तरे कशा चातुर्याने द्यायची आणि तपास भरकटवायचा कसा, याचे रीतसर प्रशिक्षण घेण्यासाठी सिया आणि चेतनने इंटरनेटवर विशेष ‘जपानी व्हिडिओ’ पाहिले होते. पोलिसांनी या दोघांच्या मोबाईल आणि लॅपटॉपची सायबर फॉरेन्सिक तपासणी केली असता, त्यांच्या वेब सर्च हिस्ट्रीमधून (Web History) या जपानी व्हिडिओंच्या लिंक्स जप्त करण्यात आल्या आहेत.

‘फ्री सेक्स ग्रुप’ आणि हॉटेलमधील संशयास्पद हालचालींचा पर्दाफाश
अधिकच्या माहितीनुसार, चेतन चौधरी आणि सिया गोयल हे दोघे केवळ एकमेकांचेच मित्र नव्हते, तर त्यांचे एका मोठ्या गुप्त नेटवर्कशी संबंध असल्याचे उघड झाले आहे. हे संशयित आरोपी पुण्यातील ज्या हॉटेल्समध्ये वारंवार भेटायचे, अशा किमान ४ ते ५ हॉटेलचे पत्ते पोलिसांनी शोधून काढले आहेत. येथील एका हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, अत्यंत चक्रावून टाकणारा प्रकार समोर आला आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये सिया आणि चेतन एकत्र एका हॉटेलच्या खोलीत जाताना दिसतात. त्यानंतर सुमारे दीड तासाने सिया एकटीच खोलीबाहेर पडते. तिच्या जाण्यानंतर काही वेळातच चेतन त्याच हॉटेलमध्ये, त्याच खोलीत सियाच्या दुसऱ्या एका मैत्रिणीसोबत आत जाताना स्पष्ट दिसत आहे. यावरून सिया आणि चेतन हे दोघे मिळून एक ‘फ्री सेक्स ग्रुप’ (Free Sex Group) चालवत होते, अशी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या