Home / देश-विदेश / G7 Summit Controversy: “फोटोसाठी तिने गयावया केली!”; डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी भडकल्या

G7 Summit Controversy: “फोटोसाठी तिने गयावया केली!”; डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी भडकल्या

G7 Summit Controversy: आंतरराष्ट्रीय राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जी7 परिषदेदरम्यान इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी आपल्यासोबत...

By: Team Navakal
G7 Summit Controversy: "फोटोसाठी तिने गयावया केली!"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी भडकल्या
Social + WhatsApp CTA

G7 Summit Controversy: आंतरराष्ट्रीय राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जी7 परिषदेदरम्यान इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी आपल्यासोबत फोटो काढण्यासाठी गयावया केली होती, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला होता. ट्रम्प यांच्या या विधानामुळे इटलीमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध धोक्यात आले आहेत.

ट्रम्प यांनी इटलीच्या एका टीव्ही चॅनेलला बोलताना सांगितले की, मेलोनी यांना माझ्यासोबत फोटो काढण्याची प्रचंड इच्छा होती. मला त्यांच्याशी बोलणे गरजेचे नव्हते, पण मला त्यांची दया आली म्हणून मी फोटो काढू दिला.

ट्रम्प यांच्या या विधानाला मेलोनी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून हा दावा पूर्णपणे खोटा आणि काल्पनिक असल्याचे म्हटले आहे.

“इटली कधीही कोणाकडे भीक मागत नाही”; मेलोनी यांचे सडेतोड उत्तर

डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर जॉर्जिया मेलोनी यांनी सोशल मीडियावरून ट्रम्प यांच्यावर थेट निशाणा साधला:

  • ट्रम्प यांचे विधान पूर्णपणे बनावट असून मला या वर्तनाचे आश्चर्य वाटते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपल्याच मित्रदेशांसोबत असे का वागतात हे समजत नाही. ट्रम्प यांनी आपल्या मित्रपक्षांचा अपमान करण्याची ही पहिलीच वेळ नाही.
  • पश्चिमेकडील देशांच्या शत्रूंबाबत ट्रम्प कधीच अशी आक्रमकता दाखवत नाहीत, उलट ते त्यांच्याशी मवाळ भूमिकेत असतात ही शरमेची बाब आहे. ट्रम्प यांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की मी आणि इटली कधीही कोणाकडे भीक मागत नाही.

इटलीच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अमेरिका दौरा रद्द; इतर मंत्र्यांचाही हल्लाबोल

या वादाचे पर्यवसान मोठ्या राजनैतिक संघर्षात झाले असून इटलीच्या मंत्र्यांनी ट्रम्प यांना सुनावले आहे:

  • दौरा तडकाफडकी रद्द: इटलीचे परराष्ट्रमंत्री अँटोनियो तायानी यांनी २१ आणि २२ जून रोजी होणारा आपला नियोजित अमेरिका दौरा रद्द केला आहे. ट्रम्प यांच्या आक्षेपार्ह शब्दांमुळे संपूर्ण इटलीचा अपमान झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
  • ऐतिहासिक संबंधांना तडा: पंतप्रधान कार्यालयाचे उपसचिव जिओवानबॅटिस्टा फझोलारी यांनी सांगितले की, ट्रम्प यांच्या अशा वागण्यामुळे अमेरिका आणि युरोपमधील ऐतिहासिक संबंध धोक्यात आले असून यामुळे अमेरिकेचेच जास्त नुकसान होत आहे.
  • संरक्षणमंत्र्यांची प्रतिक्रिया: इटलीचे संरक्षणमंत्री ग्विडो क्रोसेट्टो यांनीही ट्रम्प यांच्या दाव्याचा निषेध केला असून धमकी दिली तरी मेलोनी कोणाकडे फोटोसाठी गयावया करणार नाहीत, असे स्पष्ट केले.

पोप यांच्यावरील टीपेनंतर दोन्ही देशांमधील दरी वाढली

जॉर्जिया मेलोनी यांनी सुरुवातीला ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीला अमेरिकेशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काही काळापूर्वी ट्रम्प यांनी पोप लिओ यांच्यावर केलेल्या टीपेनंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडण्यास सुरुवात झाली.

इराण संघर्षाचा निषेध केल्याबद्दल ट्रम्प यांनी पोप यांच्यावर टीका केली होती, ज्याचा मेलोनी यांनी निषेध केला होता. त्यावर ट्रम्प यांनी मेलोनी यांच्याकडे धैर्याची कमी असल्याचा आरोप केला होता. आता या नवीन फोटो वादामुळे दोन्ही देशांमधील तणाव सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे.

Web Title:
संबंधित बातम्या