Home / देश-विदेश / PM Modi vs Kharge: “मोदी हे दहशतवादी आहेत!” मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानाने खळबळ; निवडणूक आयोगाची नोटीस

PM Modi vs Kharge: “मोदी हे दहशतवादी आहेत!” मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानाने खळबळ; निवडणूक आयोगाची नोटीस

PM Modi vs Kharge: तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या एका...

By: Team Navakal
PM Modi vs Kharge
Social + WhatsApp CTA

PM Modi vs Kharge: तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या एका विधानाने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पंतप्रधान मोदींना ‘दहशतवादी’ संबोधल्याच्या आरोपावरून भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission) खरगे यांना कडक शब्दांत नोटीस बजावली आहे. एका घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीबद्दल अशा प्रकारचे शब्द वापरणे लोकशाहीच्या प्रतिष्ठेला धक्का लावणारे असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

Mallikarjun Kharge Terrorist Remark : नेमकी काय आहे ही ‘दहशतवादी’ कमेंट?

तमिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी आयोजित एका पत्रकार परिषदेत खरगे यांनी भाजप आणि एआयएडीएमके युतीवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “एआयएडीएमके पक्ष मोदींना कसं काय साथ देऊ शकतो? ते (मोदी) एक दहशतवादी आहेत. त्यांचा पक्ष समता आणि न्यायावर विश्वास ठेवत नाही. अशा लोकांशी हातमिळवणी करणे म्हणजे लोकशाही कमकुवत करणे आहे.” खरगे यांच्या या विधानाने संपूर्ण देशात खळबळ उडाली.

भाजपचा संताप आणि निवडणूक आयोगाकडे धाव

खरगे यांच्या या विधानानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेऊन खरगे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

“एका लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या पंतप्रधानांना ‘दहशतवादी’ म्हणणे हे अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण आहे,” अशा शब्दांत पीयूष गोयल यांनी खरगे यांच्यावर टीका केली. भाजपने याप्रकरणी खरगे यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी लावून धरली आहे.

खरगे यांचे स्पष्टीकरण: “मी तसं म्हणालो नाही!”

वाढता वाद पाहून मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, “मी त्यांना वैयक्तिकरित्या दहशतवादी म्हटलेले नाही. माझा मूळ उद्देश हा होता की, पंतप्रधान सरकारी यंत्रणांचा वापर करून विरोधकांमध्ये दहशत (Terrorise) निर्माण करत आहेत. ईडी, सीबीआय आणि प्राप्तिकर विभाग यांच्या माध्यमातून ते विरोधकांना धमकावत आहेत, हे मला सांगायचे होते.”

निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत खरगे यांना 24 तासांच्या आत आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. आचारसंहितेच्या नियमांनुसार यावर काय कारवाई होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे देखील वाचा –

Abhishek Sharma Record: अभिषेक शर्माचा भीमपराक्रम! ख्रिस गेल आणि फिंचचा ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ मोडला

 Mumbai Traffic Viral Video: ‘इथून चालते व्हा!’ मुंबईत ट्रॅफिकचा खोळंबा केल्याने महिलेने भाजपच्या मंत्र्यांना भररस्त्यात झापले; पाहा व्हिडिओ

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या