Home / महाराष्ट्र / Manoj Jarange Patil : “तुझे तुकडे होतील!”; गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या वाल्मिक कराड गँगवर जरांगे पाटील कडाडले

Manoj Jarange Patil : “तुझे तुकडे होतील!”; गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या वाल्मिक कराड गँगवर जरांगे पाटील कडाडले

Manoj Jarange Patil: बीडच्या कारागृहातून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. दिवंगत सरपंच...

By: Team Navakal
Manoj Jarange Patil
Social + WhatsApp CTA

Manoj Jarange Patil: बीडच्या कारागृहातून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि त्याच्या साथीदारांनी तुरुंगात आपली दहशत निर्माण केल्याचा आरोप होत आहे.

एका व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये या टोळीने चक्क मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना गोळ्या घालण्याची धमकी दिली आहे. यावर जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत संबंधितांना गंभीर इशारा दिला आहे.

तुरुंगात कैद्याला मारहाण आणि धमकी

बीड कारागृहात असलेल्या वाल्मिक कराड गँगची दहशत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि त्यांच्या इतर साथीदारांनी अझर अब्दुल रहमान पठाण या कैद्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. याच संदर्भातील एका व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालण्याचा उल्लेख आल्याने प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे.

“तू फक्त मला बघून जा”; जरांगेंचा पलटवार

या धमकीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी वाल्मिक कराडसह त्याच्या गँगला कडक शब्दांत सुनावले आहे. ते म्हणाले, “गोळ्या घालायचं लांब राहिलं, तू फक्त मला बघून जा. तू गोळ्या घालायला तर ये, मग त्याचे दुष्परिणाम काय असतील हे तुला समजेल. आमचा समाज मोठा आहे, रक्ताचा उद्रेक काय असतो हे संपूर्ण भारत बघेल. तुझा पाय, हात आणि मुंडकं वेगवेगळ्या ठिकाणी दिसेल. तुमच्याकडे गोळ्या असतील तर मराठ्यांकडेही गोळ्या आणि कुऱ्हाडी आहेत.”

जरांगे यांनी स्पष्ट इशारा दिला की, जर ही मस्ती अशीच राहिली तर या टोळीचा एकही माणूस जिवंत राहणार नाही.

प्रशासनावर ताशेरे आणि सरकारकडे मागणी

बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरही निशाणा साधला. “जर गृहमंत्री म्हणतात की त्यांना बीडमधील गुंडाराज संपवायचा आहे, मग बीडचा जेलर का बदलला नाही? बीडमधील सर्व पोलीस आणि महसूल कर्मचारी एकदा बदलून टाका,” अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणातील टोळीचा मोरक्या कुठेही लपलेला असला, तरी समाज त्याला सोडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हे देखील वाचा – PM Modi vs Kharge: “मोदी हे दहशतवादी आहेत!” मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानाने खळबळ; निवडणूक आयोगाची नोटीस

Web Title:
संबंधित बातम्या