Home / देश-विदेश / Jantar Mantar Protest : अमानुष लाठीमार आणि अश्रूधुराचा प्रचंड प्रहारही आंदोलकांना रोखू शकले नाहीत; सर्व अडथळे तोडून हजारो तरुण थेट संसद भवन परिसरात पोहोचल्याने दिल्ली हादरली..

Jantar Mantar Protest : अमानुष लाठीमार आणि अश्रूधुराचा प्रचंड प्रहारही आंदोलकांना रोखू शकले नाहीत; सर्व अडथळे तोडून हजारो तरुण थेट संसद भवन परिसरात पोहोचल्याने दिल्ली हादरली..

Jantar Mantar Protest : राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेतील (NEET) घोटाळा आणि पेपरफुटीच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर सुरू असलेल्या ‘कॉकरोच जनता...

By: Team Navakal
CJP Protest
Social + WhatsApp CTA

Jantar Mantar Protest : राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेतील (NEET) घोटाळा आणि पेपरफुटीच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर सुरू असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) आंदोलनाने आता अत्यंत संशयास्पद आणि नाट्यमय वळण घेतले आहे. आज, २० जुलै रोजी प्रशासनाने बंदी घातलेली असताना आणि पोलिसांनी केलेला लाठीमार व अश्रूधुराचा (Tear Gas) मारा झेलूनही हजारो आंदोलक विद्यार्थी थेट संसद भवन परिसरात पोहोचले आहेत. या संघर्षानंतर जंतरमंतर परिसरातील एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. दिल्ली पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांना बदनाम करण्यासाठी आणि या शांततापूर्ण आंदोलनाला हिंसक वळण देण्यासाठी स्वतःच घटनास्थळी दगडांनी भरलेला ट्रक आणि तोडफोड झालेली कार आणून ठेवल्याचा खळबळजनक आरोप ‘सीजेपी’चे संस्थापक अभिजित दीपके (Abhijeet Dipke) यांनी केला आहे. या आरोपांमुळे दिल्ली प्रशासन आणि केंद्र सरकारवर सर्वस्तरातून नामुष्की ओढवली आहे.

“शांततापूर्ण आंदोलनाला बदनाम करण्याचा कट”; अभिजित दिपकेंकडून व्हिडिओ जारी
संसदेवर मोर्चा काढण्याच्या आधीपासूनच जंतरमंतर मैदानावर सुमारे १० हजारांहून अधिक विद्यार्थी आणि कार्यकर्ते एकत्र जमले होते. आंदोलन सुरू होण्यापूर्वीच अभिजित दीपके यांनी सोशल मीडियावरून कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले होते. ते म्हणाले होते की, “आमच्या कोणत्याही सहकाऱ्याकडून किंवा विद्यार्थ्याकडून कोणतेही गैरकृत्य अथवा कायदा हातात घेण्याचे काम होणार नाही. आपला हा संपूर्ण मोर्चा अत्यंत शांततापूर्ण आणि सनदशीर मार्गाने पार पडेल, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या या पवित्र आंदोलनाची प्रतिमा मलीन होणार नाही.”

मात्र, मोर्च्यादरम्यान जंतरमंतरच्या मुख्य आंदोलन परिसराच्या अगदी जवळ अचानक दगडांनी तुडुंब भरलेला एक मोठा डम्पर आणि सर्व काचा फुटलेली एक जुनी, नादुरुस्त कार संशयास्पदरीत्या उभी असलेली आढळली. हा प्रकार लक्षात येताच अभिजित दीपके यांनी तातडीने या दोन्ही वाहनांचे व्हिडिओ चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर प्रसिद्ध केले. व्हिडिओ शेअर करत त्यांनी थेट दिल्ली पोलिसांना प्रश्न विचारला की, “जंतरमंतर सारख्या संवेदनशील भागात, जिथे हजारो तरुण जमले आहेत, तिथे अचानक दगडांनी भरलेले ट्रक उभे करण्यामागे पोलीस प्रशासनाचा नेमका काय छुपा डाव आहे? शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यांवर स्वतःहून दगडफेक घडवून आणण्याची आणि दंगल घडवण्याची ही पूर्वतयारी चालू आहे का?”

“दिल्ली पोलिसांना लाज वाटली पाहिजे”; प्रसारमाध्यमांच्या भूमिकेवरही उपस्थित केले प्रश्न
हा गंभीर प्रकार उघडकीस आणल्यानंतर अभिजित दीपके यांनी केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या दिल्ली पोलिसांच्या कार्यपद्धतीवर अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले. आपल्या दुसऱ्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी प्रशासनाचा पर्दाफाश करताना म्हटले, “दिल्ली पोलिसांच्या या अश्लाघ्य कृत्याची त्यांना स्वतःला लाज वाटली पाहिजे. आंदोलन अजून हिंसक झालेच नाही, तर मग आधीच जंतरमंतरच्या आवारात दगडांचे ढीग आणि एक पूर्णपणे तोडफोड झालेली व्हॅन आणून का ठेवण्यात आली आहे? याचा सरळ अर्थ असा आहे की, लवकरच मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमे (Media) हीच दृश्ये दाखवून अशी बातमी चालवतील की, आंदोलक विद्यार्थ्यांनीच सरकारी मालमत्तेचे नुकसान केले आणि वाहनांची तोडफोड केली.”

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या