Home / देश-विदेश / PM Modi Cabinet Reshuffle: मोदी मंत्रिमंडळात मोठा फेरबदलाची शक्यता; शक्तिकांत दास होणार देशाचे नवे अर्थमंत्री?

PM Modi Cabinet Reshuffle: मोदी मंत्रिमंडळात मोठा फेरबदलाची शक्यता; शक्तिकांत दास होणार देशाचे नवे अर्थमंत्री?

PM Modi Cabinet Reshuffle: तप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच मोठा फेरबदल आणि विस्तार होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली...

By: Team Navakal
PM Modi Cabinet Reshuffle: मोदी मंत्रिमंडळात मोठा फेरबदलाची शक्यता; शक्तिकांत दास होणार देशाचे नवे अर्थमंत्री?
Social + WhatsApp CTA

PM Modi Cabinet Reshuffle: तप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच मोठा फेरबदल आणि विस्तार होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. या फेरबदलामध्ये अनेक मोठे आणि धक्कादायक बदल पाहायला मिळू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कामगिरी समाधानकारक नसलेल्या अनेक विद्यमान मंत्र्यांना पदावरून हटवले जाऊ शकते, तर काही मंत्र्यांची खाती बदलली जाण्याची दाट शक्यता आहे.

या संपूर्ण मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत सध्या एका नावाचा सर्वाधिक गाजावाजा होत आहे, ते नाव म्हणजे रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास. तमिळनाडू कॅडरचे माजी आयएएस अधिकारी आणि सध्या पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून कार्यरत असलेले शक्तिकांत दास हे देशाचे पुढील अर्थमंत्री होऊ शकतात, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.

शक्तिकांत दास इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर

शक्तिकांत दास यांच्याकडे अर्थमंत्री पद सोपवले गेल्यास ते देशाच्या राजकीय इतिहासात एक नवा विक्रम नोंदवतील. देशाच्या इतिहासात आतापर्यंत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर राहिलेल्या फक्त २ व्यक्तींनी अर्थमंत्री पद भूषवले आहे. शक्तिकांत दास हे या यादीतील तिसरे व्यक्ती ठरतील.

  • सी डी देशमुख: हे रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर (1943-1949) होते. त्यानंतर त्यांनी 1950 ते 1956 या काळात देशाचे केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम पाहिले.
  • डॉ. मनमोहन सिंग: त्यांनी 1982 ते 1985 या काळात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरपद सांभाळले. पुढे 1991 ते 1996 दरम्यान ते देशाचे अर्थमंत्री बनले आणि त्यानंतर 2004 ते 2014 या काळात त्यांनी पंतप्रधान म्हणून देशाचे नेतृत्व केले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हा बहुमान मिळवणारे ते एकमेव नेते आहेत.

शक्तिकांत दास यांनी देशाचे २५ वे रिझर्व्ह बँक गव्हर्नर म्हणून अत्यंत यशस्वी काम पाहिले आहे. त्यांचा बायोडाटा अर्थमंत्री पदासाठी सर्वात मजबूत मानला जात आहे, कारण त्यांनी आतापर्यंत ८ केंद्रीय अर्थसंकल्प (बजेट) तयार करण्याच्या प्रक्रियेत थेट सहभाग घेतला आहे. अर्थकारण, करप्रणाली आणि गुंतवणूक या विषयांवर त्यांची पकड जबरदस्त आहे.

खासदार नसतानाही कशी मिळणार संधी? यूपीतून राज्यसभेचा पर्याय

शक्तिकांत दास हे सध्या संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे म्हणजेच लोकसभा किंवा राज्यसभेचे सदस्य नाहीत. नियमांनुसार, सदस्य नसतानाही ते अर्थमंत्री बनू शकतात, परंतु त्यांना पुढील ६ महिन्यांच्या आत कोणत्याही एका सभागृहाचे सदस्यत्व मिळवणे बंधनकारक असेल. भाजपसमोर त्यांना उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर पाठवण्याचा उत्तम पर्याय उपलब्ध आहे. कारण नोव्हेंबर 2026 मध्ये उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या 10 जागा रिक्त होत आहेत.

पंतप्रधानांचे सर्वात विश्वासू सहकारी; ‘क्रायसिस मॅनेजमेंट’मध्ये अव्वल

शक्तिकांत दास हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वात जवळच्या आणि विश्वासू अधिकाऱ्यांपैकी एक मानले जातात. त्यांनी २०१६ मधील नोटाबंदीच्या काळात आणि त्यानंतर आलेल्या कोविड-19 महामारीच्या गंभीर संकटात देशाची अर्थव्यवस्था सांभाळण्यात अफाट कौशल्य दाखवले होते. त्यांच्या या कामगिरीसाठी जागतिक पातळीवर त्यांना ‘A+’ रेटिंग आणि सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

इतिहासाचे विद्यार्थी ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर: पाहा त्यांचा प्रवास

शक्तिकांत दास यांचा जन्म 26 फेब्रुवारी 1957 रोजी ओडिशामधील भुवनेश्वर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण भुवनेश्वरमधूनच पूर्ण झाले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते दिल्लीला आले. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या प्रसिद्ध ‘सेंट स्टीफन्स कॉलेज’मधून इतिहास विषयात बीए आणि एमए पदवी घेतली. पुढे त्यांनी बर्मिंगहॅम विद्यापीठातून लोकप्रशासनात पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले.

आरबीआय ते पीएमओ: डिसेंबर 2018 ते डिसेंबर 2024 पर्यंत त्यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरपद सांभाळले. तिथून निवृत्त झाल्यानंतर, फेब्रुवारी 2025 मध्ये पंतप्रधान मोदींनी त्यांची स्वतःचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती केली. तमिळनाडूमध्ये सेवेत असताना त्यांनी दिंडिगुल आणि कांचीपुरम जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी म्हणूनही उत्तम काम केले आहे.

३७ वर्षांची प्रशासकीय कारकीर्द: ते 1980 च्या बॅचचे तमिळनाडू कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. इतिहास विषयाचे विद्यार्थी असूनही त्यांनी आपल्या ३७ वर्षांपेक्षा लांब कारकिर्दीत सर्वाधिक काम देशाच्या आर्थिक आणि महसूल विभागात केले. त्यांनी देशाचे महसूल सचिव आणि आर्थिक व्यवहार सचिव यांसारख्या सर्वोच्च पदांवर काम केले.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या