Home / देश-विदेश / US Iran Conflict: पुन्हा युद्ध पेटले! अमेरिकेचे इराणवर थेट हवाई हल्ले

US Iran Conflict: पुन्हा युद्ध पेटले! अमेरिकेचे इराणवर थेट हवाई हल्ले

US Iran Conflict: अमेरिका आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण यांच्यात अचानक पुन्हा अत्यंत भीषण लष्करी संघर्ष पेटला आहे. अमेरिकन वायुसेनेने...

By: Team Navakal
US Iran Conflict: पुन्हा युद्ध पेटले! अमेरिकेचे इराणवर थेट हवाई हल्ले
Social + WhatsApp CTA

US Iran Conflict: अमेरिका आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण यांच्यात अचानक पुन्हा अत्यंत भीषण लष्करी संघर्ष पेटला आहे. अमेरिकन वायुसेनेने इराणच्या हद्दीत घुसून अनेक लष्करी तळांवर थेट हवाई हल्ले केले आहेत. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये इराणने एका व्यापारी जहाजावर ड्रोन हल्ला केल्याचा आरोप अमेरिकेने केला होता.

या कथित हल्ल्यानंतर अमेरिकेने ही मोठी लष्करी कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वीच स्वित्झर्लंडमध्ये दोन्ही देशांदरम्यान झालेल्या नाजूक शांतता कराराला हरताळ फासत अमेरिकेने हा पहिला थेट लष्करी हल्ला केला आहे.

अमेरिकेच्या या कारवाईनंतर इराण देखील शांत बसलेला नाही. इराणच्या बलाढ्य ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने (IRGC) या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. इराणच्या सैन्याने या भागात असलेल्या अमेरिकन लष्करी तळांना (मिलिटरी झोन) लक्ष्य करत क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे. वॉशिंग्टनच्या हल्ल्यांना चोख उत्तर दिले जाईल अशी चेतावणी इराणने आधीच दिली होती. सध्या अमेरिकन तळांचे किती नुकसान झाले आहे, याचा तपशील येणे बाकी आहे.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा तो इशारा आणि काही मिनिटांतच हल्ला

अमेरिकेची ही लष्करी कारवाई होण्याच्या अवघ्या काही मिनिटे आधी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसबाहेर माध्यमांशी बोलताना याचे संकेत दिले होते. पत्रकारांनी जेव्हा ट्रम्प यांना विचारले की, अमेरिका इराणच्या कारवाईला प्रत्युत्तर देणार का? त्यावर ट्रम्प यांनी “तुम्हाला लवकरच समजेल,” असे सूचक उत्तर दिले होते.

या विधानानंतर लगेचच अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) इराणमध्ये ‘प्रिसिजन स्ट्राईक’ म्हणजेच अचूक लक्ष्य भेदणारे हल्ले केल्याची घोषणा केली.

अमेरिकन लष्कराच्या माहितीनुसार, २५ जून रोजी इराणने सिंगापूरचा ध्वज असलेल्या ‘एम/व्ही एव्हर लव्हली’ या व्यापारी जहाजावर आत्मघाती ड्रोनद्वारे हल्ला केला होता. हे जहाज ओमानच्या किनारपट्टीवरून जात असताना हा हल्ला झाला. याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन लढाऊ विमानांनी इराणमधील क्षेपणास्त्र आणि ड्रोन साठवणूक केंद्रे तसेच किनारपट्टीवरील रडार यंत्रणांवर बॉम्बहल्ला करून ते उद्ध्वस्त केले.

“हिंसेचे उत्तर हिंसेनेच मिळेल”; अमेरिकेचा इराणला कडक इशारा

या हल्ल्यानंतर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर इराणला अत्यंत कडक शब्दांत ताकीद दिली आहे. जेडी व्हॅन्स यांनी म्हटले आहे:

इराणने युद्धबंदीच्या करारावर स्वाक्षरी केली होती आणि आम्ही त्याचे पूर्ण पालन केले. जर या कराराच्या अंमलबजावणीबाबत इराणचे काही मतभेद होते, तर ते फोन करून बोलू शकत होते. परंतु, त्यांनी आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावर हिंसा केली आहे आणि आता या हिंसेचे उत्तर हिंसेनेच दिले जाईल.

दुसरीकडे, अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने इराणच्या कारवाईला कराराचे ‘मूर्खपणाचे उल्लंघन’ म्हटले आहे. इराणच्या या कृत्यामुळे जगातील सर्वात व्यस्त सागरी व्यापारी मार्गावरील वाहतुकीच्या स्वातंत्र्याला धोका निर्माण झाला असून, अमेरिका या भागात शांतता राखण्यासाठी आणि व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे सतर्क असल्याचे सैन्याने स्पष्ट केले आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या