Home / लेख / नवीन अवतारात TVS Ntorq 125 लाँच! स्पोर्टी लूक आणि भन्नाट फीचर्स; पाहा किंमत

नवीन अवतारात TVS Ntorq 125 लाँच! स्पोर्टी लूक आणि भन्नाट फीचर्स; पाहा किंमत

TVS Ntorq 125 Launch: भारतातील दुचाकी वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी टीव्हीएस मोटरने तरुणांच्या आवडीचा आणि परफॉर्मेंस स्कूटर सेगमेंट गाजवणारा ‘TVS...

By: Team Navakal
नवीन अवतारात TVS Ntorq 125 लाँच! स्पोर्टी लूक आणि भन्नाट फीचर्स; पाहा किंमत
Social + WhatsApp CTA

TVS Ntorq 125 Launch: भारतातील दुचाकी वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी टीव्हीएस मोटरने तरुणांच्या आवडीचा आणि परफॉर्मेंस स्कूटर सेगमेंट गाजवणारा ‘TVS Ntorq 125’ नवीन आणि अधिक आकर्षक अवतारात लाँच केला आहे. बाजारात या स्कूटरची क्रेझ कायम ठेवण्यासाठी कंपनीने यात मोठे अपडेट्स दिले आहेत.

नवीन मॉडेलमध्ये आकर्षक कलर ऑप्शन्स आणि स्पोर्टी ग्राफिक्सचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे हा स्कूटर आता पूर्वीपेक्षा अधिक उठून दिसतो.

हा स्कूटर प्रामुख्याने पाच वेगवेगळ्या ट्रिम्समध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये डिस्क, सुपर स्कॉड, रेस एडिशन, रेस एक्सपी आणि एक्सटी यांचा समावेश होतो. कंपनीने हे नवीन रंगांचे अपडेट्स विशेषतः ‘डिस्क’ आणि ‘रेस एडिशन’ या दोन लोकप्रिय ट्रिम्स अंतर्गत दिले आहेत. इतर ट्रिम्स पूर्वीप्रमाणेच बाजारात उपलब्ध राहतील.

TVS Ntorq 125 चे जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स:

लूक आणि डिझाईनमध्ये बदल झाले असले, तरी या स्कूटरमध्ये ग्राहकांना फ्लॅगशिप फीचर्सचा अनुभव मिळणार आहे:

  • डिजिटल डिस्प्ले आणि कनेक्टिव्हिटी: या स्कूटरमध्ये फुली डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर स्टँडर्ड स्वरूपात दिले आहे. यामध्ये टीव्हीएस स्मार्टकनेक्ट ही ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सिस्टीम मिळते, ज्याद्वारे नेव्हिगेशन आणि कॉल-मेसेज अ‍ॅलर्ट्स स्क्रीनवर पाहता येतात.
  • लूक आणि लायटिंग: स्कूटरला अधिक स्पोर्टी बनवण्यासाठी कलर मॅच केलेले अ‍ॅलॉय व्हील्स आणि कडक ग्राफिक्स दिले आहेत. सुरक्षेसाठी यात एलईडी हेडलाईट्स, एलईडी डीआरएल सिग्नेचर आणि आकर्षक एलईडी टेल लाईट्स मिळतात.
  • इतर वैशिष्ट्ये: यात 12 इंचाचे अ‍ॅलॉय व्हील्स, मोठा फ्लॅट फ्लोरबोर्ड, सामान ठेवण्यासाठी मोठी अंडरसीट स्टोरेज स्पेस आणि स्पोर्ट्स बाईकसारखा आवाज देणारा एक्झॉस्ट नोट दिलेला आहे.
  • दमदार इंजिन क्षमता: इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यात 124.8 सीसीचे सिंगल सिलेंडर, एअर आणि लिक्विड कूल्ड इंजिन मिळते. हे इंजिन 9.5 पीएसची पॉवर आणि 10.6 एनएमचा टॉर्क जनरेट करते. फक्त ‘रेस एक्सपी’ या मॉडेलमध्ये अधिक ट्यून केलेले इंजिन मिळते, जे 10.2 पीएसची पॉवर आणि 10.8 एनएमचा टॉर्क देते.

TVS Ntorq 125 Launch: जाणून घ्या नवीन रंगांचे पर्याय आणि किंमत

कंपनीने नवीन अवतारातील एनटॉर्कच्या किमती अतिशय स्पर्धात्मक ठेवल्या आहेत. मात्र, या सुरुवातीच्या (इंट्रोडक्टरी) किमती असून भविष्यात कंपनी यामध्ये वाढ करू शकते.

बेस डिस्क ट्रिममध्ये दोन नवीन रंगांचे पर्याय दिले आहेत, ज्यामध्ये मिडनाइट ब्लैक आणि स्पिती व्हाईटचा समावेश आहे. तसेच सध्याच्या नार्डो ग्रे रंगाला नवीन ग्राफिक्ससह अपडेट केले आहे. ‘2026 TVS Ntorq 125 डिस्क’ व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 82500 रुपये ठेवण्यात आली आहे.

रेस एडिशन ट्रिममध्ये तीन नवीन आणि भन्नाट रंग मिळतील, ज्यामध्ये ड्रिफ्ट ब्लू, इन्फर्नो रेड आणि रश ग्रीन यांचा समावेश आहे. ‘2026 TVS Ntorq 125 रेस एडिशन’ व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 87950 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

भारतीय बाजारपेठेत या स्कूटरची थेट स्पर्धा होंडा डीओ 125, हिरो झूम 125, सुझुकी एव्हेनिस, यामाहा रेझेडआर 125 आणि अप्रिलिया एसआर 125 यांसारख्या तगड्या स्कूटरशी होणार आहे.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या