Home / देश-विदेश / White House Dinner Shooting : अमेरिका हादरली! व्हाईट हाऊसच्या डिनर पार्टीत गोळीबार करणारा कोल ॲलन नक्की आहे तरी कोण?

White House Dinner Shooting : अमेरिका हादरली! व्हाईट हाऊसच्या डिनर पार्टीत गोळीबार करणारा कोल ॲलन नक्की आहे तरी कोण?

White House Dinner Shooting : वॉशिंग्टनमधील प्रतिष्ठित ‘व्हाईट हाऊस वार्ताहर दिन’ (White House Correspondents’ Dinner) कार्यक्रमादरम्यान गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला....

By: Team Navakal
White House Dinner Shooting
Social + WhatsApp CTA

White House Dinner Shooting : वॉशिंग्टनमधील प्रतिष्ठित ‘व्हाईट हाऊस वार्ताहर दिन’ (White House Correspondents’ Dinner) कार्यक्रमादरम्यान गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला. या घटनेने अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सुरक्षा यंत्रणांनी ३१ वर्षीय संशयित तरुणाला अटक केली असून, त्याचे नाव कोल टॉमस ॲलन असल्याचे समोर आले आहे.

White House Dinner Shooting :कोण आहे हा संशयित आरोपी?

कोल टॉमस ॲलन हा कॅलिफोर्नियातील टोरन्स येथील रहिवासी आहे. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, तो अत्यंत सुशिक्षित असून त्याने प्रतिष्ठित ‘कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (Caltech) मधून पदवी मिळवली आहे. त्याच्या सोशल मीडिया प्रोफाईलवरून खालील माहिती समोर आली आहे:

  1. शिक्षण: 2017 मध्ये कॅलटेकमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी आणि 2025 मध्ये कॉम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.
  2. व्यवसाय: तो अर्धवेळ शिक्षक आणि स्वतंत्र गेम डेव्हलपर म्हणून काम करतो. विशेष म्हणजे डिसेंबर 2024 मध्ये त्याला एका खाजगी संस्थेकडून ‘टीचर ऑफ द मंथ’ हा पुरस्कारही मिळाला होता.
  3. अनुभव: यापूर्वी त्याने रोबोटिक्स स्पर्धेतही यश मिळवले असून तो विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांमध्ये रस असणारा तरुण म्हणून ओळखला जात होता.

White House Dinner Shooting :नेमकी घटना काय घडली?

वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमध्ये हा वार्षिक सोहळा सुरू होता. यावेळी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांच्या पत्नी मेलानिया, उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स आणि अनेक मंत्रिमंडळ सचिव उपस्थित होते. ज्या हॉलमध्ये हे दिग्गज उपस्थित होते, त्याच्या अगदी बाहेर आरोपीने सीक्रेट सर्व्हिस एजंटवर शॉटगनने गोळीबार केला.

सीक्रेट सर्व्हिसने तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा त्याच हॉटेलमध्ये पाहुणा म्हणून वास्तव्यास होता. मात्र, त्याने इतक्या हाय-प्रोफाईल कार्यक्रमात गोळीबार का केला आणि त्याचा खरा हेतू काय होता, याचे गूढ अद्याप कायम आहे.

Web Title:
संबंधित बातम्या