National peroxide limited: हायड्रोजन पेरॉक्साईड निर्मितीतील मोठी कंपनी

National peroxide limited ही परॉक्साईड केमिकल कंपनी असून हायड्रोजेन पेरॉक्साईड तयार करणारी भारतील सर्वात मोठी कंपनी आहे. बॉम्बे डायिंग आणि लपोर्टे इंडस्ट्रीज कडून ही कंपनी स्थापन केली असून या दोन्ही कंपनीकडून ही कंपनी चालवली जाते.

हायड्रोजन पेरॉक्साइड सोबतच ही कंपनी कॉम्प्रेस हायड्रोजन गॅस आणि Paracetic एसिडचीही निर्मिती या कंपनीकडून केली जाते.

हायड्रोजन पेरॉक्साइडचा उपयोग विविध उद्योगांमध्ये केला जातो. तेल, पाणी, effluent उपचार, पेपर पल्प ब्लिचिंग, केमिकल सिंथेसिस, टेक्सटाइल ब्लिचिंग इंडस्ट्री, शुगर ब्लिचिंग इंडस्ट्री आदी ठिकाणी या हायड्रोजन पेरॉक्साइडचा वापर केला जातो. हे केमिकल बनवण्याचा प्लांट महाराष्ट्रातच आहे. दरवर्षी जवळपास दीड लाख टन रसायन तयार केले जाते.

हीकंपनी पब्लिक लिमिटेड कंपनी असून १९५४ साली या कंपनीची स्थापना झाली होती. तसेच BSE मध्येही ही कंपनी लिस्टेड आहे. येत्या काळात हायड्रोजन पेरॉक्साइडची मागणी वाढणार आहे त्यामुळे या कंपन्या चांगल्या परतावा देऊ शकतात. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार हायड्रोजन पेरॉक्साइड निर्मिती करणाऱ्या कंपन्याचे शेअर्स काही दिवसात वधारणार आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. त्यातच नॅशनल हायड्रोजन परॉक्साइड ही कंपनी देशातील मोठी कंपनी असून या कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना मालामाल बनवू शकतात.

Scroll to Top