KKR vs LSG: लखनऊच्या इकाना स्टेडियमवर रविवारी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात झालेल्या सामन्यात मोठा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. केकेआरचा युवा फलंदाज अंगक्रिश रघुवंशी याला ‘ऑबस्ट्रक्टिंग द फील्ड’ (क्षेत्ररक्षणात अडथळा आणणे) नियमांतर्गत बाद घोषित करण्यात आल्याने मैदानात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
नेमका वाद काय?
ही घटना केकेआरच्या डावातील ५ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर घडली. प्रिन्स यादवच्या चेंडूवर धाव घेण्याच्या प्रयत्नात असताना कॅमेरून ग्रीनने रघुवंशीला माघारी धाडले. यावेळी क्षेत्ररक्षकाने फेकलेला चेंडू रघुवंशीच्या पायाला लागला. मोहम्मद शमी आणि कर्णधार ऋषभ पंत यांनी अपील केल्यानंतर तिसऱ्या पंचांनी रिप्ले पाहिला. पंचांच्या मते, रघुवंशीने जाणीवपूर्वक आपली दिशा बदलली होती, जेणेकरून चेंडू यष्टीरक्षकापर्यंत पोहोचू शकणार नाही.
या निर्णयामुळे रघुवंशी प्रचंड संतापला. त्याने मैदानावरच पंचांशी हुज्जत घातली आणि बाहेर जाताना रागाच्या भरात आपले हेल्मेटही फेकून दिले. केकेआरच्या डगआउटमध्येही या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करण्यात आले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ANGKRISH RAGHUVANSHI ANGRY ON POOR UMPIRING 🤬 pic.twitter.com/DBJdg9HRP6
— Rohshh45 (@rohitfc58737) April 26, 2026
सामन्याचा थरार: सुपर ओव्हरमध्ये निकाल
या वादाव्यतिरिक्त सामन्यात खेळाचाही जबरदस्त स्तर पाहायला मिळाला. रिंकू सिंगच्या नाबाद ८३ धावांच्या बळावर केकेआरने १५५ धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरात लखनऊला शेवटच्या चेंडूवर ७ धावांची गरज असताना मोहम्मद शमीने षटकार ठोकून सामना बरोबरीत सोडवला.
सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला, जिथे कोलकाता नाईट रायडर्सने अटीतटीच्या लढतीत लखनऊ सुपर जायंट्सवर विजय मिळवला. लखनऊकडून मोहसीन खानने ५ बळी घेतले, तर रिंकू सिंगने शेवटच्या षटकात चार षटकार ठोकून केकेआरला सामन्यात जिवंत ठेवले होते.
हे देखील वाचा –










