Home / क्रीडा / PAK vs BAN : बाबर आझमचा ‘गेम’ झाला? आधी संघात घेतलं, मग डच्चू दिला; पाकिस्तान-बांगलादेश कसोटीपूर्वी नेमकं काय घडलं?

PAK vs BAN : बाबर आझमचा ‘गेम’ झाला? आधी संघात घेतलं, मग डच्चू दिला; पाकिस्तान-बांगलादेश कसोटीपूर्वी नेमकं काय घडलं?

PAK vs BAN : पाकिस्तान क्रिकेटमधील अंतर्गत कलह आणि अनपेक्षित निर्णय पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून...

By: Team Navakal
PAK vs BAN
Social + WhatsApp CTA

PAK vs BAN : पाकिस्तान क्रिकेटमधील अंतर्गत कलह आणि अनपेक्षित निर्णय पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम याला अचानक बाहेर ठेवण्यात आल्याने क्रीडा जगतात मोठी खळबळ उडाली आहे. अधिकृतरीत्या बाबरला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत असले तरी, तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे दावे केले जात असल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

बांगलादेश दौऱ्याची सुरुवात आणि धक्कादायक निर्णय-
आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) स्पर्धेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली दोन सामन्यांची कसोटी मालिका आजपासून सुरू झाली. कर्णधार शान मसूदच्या नेतृत्वाखालील संघात अनुभवी बाबर आझमचा समावेश निश्चित मानला जात होता. मात्र, ८ मे रोजी सकाळी सामना सुरू होण्यापूर्वी काही तास आधी बाबरला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. शान मसूदने नाणेफेकीच्या वेळी स्पष्ट केले की, बाबरला दुखापत झाल्यामुळे त्याच्या बाबतीत कोणताही धोका न पत्करण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला आहे.

‘फिट’ असूनही बाबरला डच्चू? सोशल मीडियावर चर्चांना उधाण-
संघ व्यवस्थापनाने ‘दुखापतीचे’ कारण दिले असले तरी, सोशल मीडियावर वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बाबर आझमने सामन्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सराव सत्रात पूर्ण ताकदीने सहभाग घेतला होता. तो फलंदाजीचा सराव करताना कुठेही अस्वस्थ वाटत नव्हता. यामुळेच, मुख्य प्रशिक्षक आकिब जावेद यांनी युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी जाणीवपूर्वक बाबरला विश्रांतीच्या नावाखाली बाहेर बसवल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या निर्णयामुळे बाबर स्वतः कमालीचा नाराज असल्याचे समजते.

नव्या दमाच्या खेळाडूंना संधी-
बाबर आझमच्या अनुपस्थितीत पाकिस्तानने या सामन्यात दोन नव्या खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली आहे. सलामीवीर म्हणून अझान अवैस याला पाचारण करण्यात आले आहे. अझानने अंडर-१९ आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीची छाप पाडली आहे. तसेच, कायदे-आझम ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या अब्दुल्ला फजल याचाही संघात समावेश करण्यात आला आहे. नवीन रक्ताला वाव देण्याच्या नादात अनुभवाकडे दुर्लक्ष करणे पाकिस्तानला महागात पडणार की फलदायी ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कर्णधार शान मसूदची भूमिका-
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शान मसूदने सांगितले की, “बाबर आझमसारखा खेळाडू बाहेर असणे हे दुर्दैवी आहे. हा निर्णय शेवटच्या क्षणी घ्यावा लागला. आम्हाला आगामी सामने पाहता त्याच्या दुखापतीबाबत जोखीम घ्यायची नव्हती.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या