Home / क्रीडा / Vaibhav Sooryavanshi India Debut: वयाच्या 15 व्या वर्षी वैभव सूर्यवंशी इतिहास रचणार! पण ‘या’ नियमामुळे ड्रेसिंग रूममध्ये एन्ट्री नाही

Vaibhav Sooryavanshi India Debut: वयाच्या 15 व्या वर्षी वैभव सूर्यवंशी इतिहास रचणार! पण ‘या’ नियमामुळे ड्रेसिंग रूममध्ये एन्ट्री नाही

Vaibhav Sooryavanshi India Debut: भारतीय क्रिकेट जगतात या शुक्रवारी एक नवा इतिहास रचला जाण्याची शक्यता आहे. अवघ्या 15 वर्षांचा युवा...

By: Team Navakal
Vaibhav Sooryavanshi India Debut: वयाच्या 15 व्या वर्षी वैभव सूर्यवंशी इतिहास रचणार! पण 'या' नियमामुळे ड्रेसिंग रूममध्ये एन्ट्री नाही
Social + WhatsApp CTA

Vaibhav Sooryavanshi India Debut: भारतीय क्रिकेट जगतात या शुक्रवारी एक नवा इतिहास रचला जाण्याची शक्यता आहे. अवघ्या 15 वर्षांचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. बेलफास्ट येथे होणाऱ्या या सामन्यात मैदानात उतरताच तो भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरू शकतो.

यापूर्वी हा विक्रम महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने नोव्हेंबर 1989 मध्ये वयाच्या 16 वर्षे आणि 205 दिवसांचा असताना पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केले होते. आता वैभव हा विक्रम अवघ्या 15 वर्षे 91 दिवसांचा असताना मोडीत काढणार आहे.

मात्र, भारतीय संघात स्थान मिळूनही वैभवला इंग्लंड दौऱ्यादरम्यान एका खास नियमाचा सामना करावा लागणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या (ईसीबी) कडक नियमांमुळे वैभवला प्रत्येक सामन्यात वरिष्ठ भारतीय खेळाडूंसोबत मुख्य ड्रेसिंग रूम शेअर करता येणार नाही.

नेमका काय आहे तो कडक नियम? ज्यामुळे रोखली एन्ट्री

इंग्लंड आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा जगतातील बाल संरक्षण नियमांनुसार (सेफगार्डिंग प्रोटोकॉल) हा निर्णय घेण्यात आला आहे. या नियमांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:

  • १६ वर्षांखालील खेळाडूंसाठी स्वतंत्र व्यवस्था: नियमांनुसार 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या कोणत्याही खेळाडूला वरिष्ठ खेळाडूंसोबत कपडे बदलण्याची परवानगी नसते. त्यामुळे इंग्लंडमधील प्रत्येक मैदानावर वैभवसाठी स्वतंत्र वैयक्तिक चेंजिंग रूमची व्यवस्था केली जाईल.
  • फक्त मॅच आणि टीम मिटिंग पुरती परवानगी: ब्रिटीश प्रसारमाध्यमांच्या अहवालानुसार, वैभवला केवळ प्रत्यक्ष सामन्याच्या वेळी आणि रणनीती ठरवण्यासाठी होणाऱ्या सांघिक बैठकीदरम्यानच मुख्य ड्रेसिंग रूममध्ये येण्याची परवानगी असेल. सामना सुरू होण्यापूर्वी आणि संपल्यानंतर त्याला स्वतःच्या खाजगी रूमचाच वापर करावा लागेल.
  • पालकही सोबत जाणार: इंग्लंडमधील वातावरणाशी आणि या नवीन नियमांशी जुळवून घेता यावे, म्हणून वैभवचे आई-वडील देखील या दौऱ्यात त्याच्यासोबत युनायटेड किंगडमला गेले आहेत.

इंग्लंडमध्ये ही सामान्य पद्धत; फुटबॉलमध्येही झालाय असा प्रकार

इंग्लंडमधील क्रीडा जगतात ही अतिशय सामान्य आणि प्रमाणित पद्धत आहे. गेल्या फुटबॉल हंगामात आर्सेनल क्लबच्या मॅक्स डौमन या १५ वर्षीय खेळाडूलाही डिसेंबरमध्ये तो १६ वर्षांचा होईपर्यंत अशाच प्रकारे सहकाऱ्यांपासून वेगळी चेंजिंग रूम वापरावी लागली होती. भारतामध्ये असे नियम लागू नसल्याने वैभवसाठी हा अनुभव पूर्णपणे नवीन असेल.

आयर्लंडविरुद्ध बेलफास्ट येथे शुक्रवार आणि रविवारी २ टी-20 सामने खेळले जातील. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंडमधील डरहम, मँचेस्टर, नॉटिंगहॅम, ब्रिस्टल आणि साऊथॅम्प्टन येथे सामने खेळणार आहे. या संपूर्ण दौऱ्यात वैभवला कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे सुरक्षा अधिकारी भारतीय संघाच्या समन्वयकासोबत मिळून प्रत्येक स्टेडियमवर स्वतंत्र व्यवस्था चोख ठेवण्यासाठी काम करत आहेत.

हे देखील वाचा – Lohagad Fort Murder Case: “माझा मुलगा खूप लांब उभा होता…”; लोहगड मर्डर केसमध्ये नवा ट्विस्ट! आरोपीच्या वडिलांचा खळबळजनक दावा

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या