Home / लेख / Amazon Prime Day 2026: शॉपिंगची सुवर्णसंधी! अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेलची तारीख जाहीर; वनप्लस, आयफोन आणि सॅमसंगवर मिळणार बंपर डिस्काउंट

Amazon Prime Day 2026: शॉपिंगची सुवर्णसंधी! अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेलची तारीख जाहीर; वनप्लस, आयफोन आणि सॅमसंगवर मिळणार बंपर डिस्काउंट

Amazon Prime Day 2026: ऑनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. जगातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनने आपल्या सर्वात...

By: Team Navakal
Amazon Prime Day 2026: शॉपिंगची सुवर्णसंधी! अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेलची तारीख जाहीर; वनप्लस, आयफोन आणि सॅमसंगवर मिळणार बंपर डिस्काउंट
Social + WhatsApp CTA

Amazon Prime Day 2026: ऑनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. जगातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनने आपल्या सर्वात मोठ्या शॉपिंग इव्हेंटची म्हणजेच ‘Amazon Prime Day 2026’ सेलची अधिकृत तारीख जाहीर केली आहे.

भारतात यंदा या सेलचे १० वे वर्ष (एडिशन) असून हा सेल सलग ३ दिवस लाईव्ह राहणार आहे. या सेल दरम्यान ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, घरगुती उपकरणांसह अनेक कॅटेगरीतील प्रॉडक्ट्सवर बंपर डिस्काउंट आणि स्पेशल ऑफर्सचा लाभ घेता येईल.

अ‍ॅमेझॉनने सेलच्या तारखा जाहीर करतानाच काही प्रमुख ब्रँड्सच्या डील्सवरून पडदा उठवला आहे. तसेच खरेदी करताना ग्राहकांना अधिक आर्थिक फायदा व्हावा, यासाठी निवडक बँक कार्ड्सचा वापर करून शॉपिंग केल्यास अतिरिक्त बँक डिस्काउंट आणि कॅशबॅक देखील दिला जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

प्राइम डे सेलचे वेळापत्रक

  • सेल कधी सुरू होणार: अ‍ॅमेझॉनचा हा प्राइम डे सेल 4 जुलै रोजी रात्री 12:00 वाजता सुरू होईल.
  • सेल कधी संपणार: हा ३ दिवसांचा भव्य शॉपिंग इव्हेंट 6 जुलै रोजी संपेल.

स्मार्टफोन्सवर ऐतिहासिक सूट; पाहा प्रमुख डील्स

अ‍ॅमेझॉनने आपल्या विशेष पेजवर काही भन्नाट मोबाईल डील्स जाहीर केल्या आहेत, ज्या बजेट सेगमेंटपासून ते थेट फ्लॅगशिप सेगमेंटपर्यंतच्या आहेत:

  • OnePlus 13 वर थेट २० हजारांची बचत: बाजारामध्ये 69999 रुपयांना लाँच झालेला प्रीमियम फोन ‘OnePlus 13’ या सेलमध्ये बँक ऑफर्ससह अवघ्या 49999 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.
  • Redmi Turbo 5 5G: हा शक्तिशाली स्मार्टफोन 37999 रुपयांना लाँच करण्यात आला होता. मात्र, सेलमध्ये बँक आणि कूपन ऑफर्स एकत्र करून ग्राहक हा फोन 34999 रुपयांना खरेदी करू शकतील.
  • iQOO Z10 Lite: बजेटमध्ये चांगला फोन शोधणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक उत्तम पर्याय असेल. बँक डिस्काउंटचा वापर करून हा ५जी फोन फक्त 13999 रुपयांमध्ये घरी आणता येईल.

गॅजेट्स आणि होम अप्लायन्सेसवर ८० टक्क्यांपर्यंत सूट

मोबाईल फोन व्यतिरिक्त अ‍ॅमेझॉनने इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर गृहोपयोगी वस्तूंवरही मोठ्या सवलती जाहीर केल्या आहेत:

  • लॅपटॉप आणि अ‍ॅक्सेसरीज: गेमिंग लव्हर्ससाठी ‘HP Victus Ryzen 7’ हा गेमिंग लॅपटॉप आकर्षक किमतीत उपलब्ध असेल. याशिवाय एकूण इलेक्ट्रॉनिक्स आणि अ‍ॅक्सेसरीजवर तब्बल 80% पर्यंतचा डिस्काउंट दिला जाईल.
  • अ‍ॅमेझॉन डिवाइसेस: टीव्ही पाहण्याचा अनुभव बदलण्यासाठी ‘Fire TV Stick HD’ वर विशेष सवलत दिली जाणार आहे.
  • स्मार्ट होम अप्लायन्सेस: कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) कनेक्टिव्हिटी तंत्रज्ञान असलेली ‘IFB’ कंपनीची फ्रंट-लोड वॉशिंग मशीन या सेलचे मुख्य आकर्षण असणार आहे.

आयफोन आणि सॅमसंग गॅलेक्सी एस२६ अल्ट्रावरही नजर

सेल सुरू होण्यापूर्वी अ‍ॅमेझॉन आणखी बऱ्याच ऑफर्स जाहीर करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अ‍ॅपलच्या लेटेस्ट आयफोन मॉडेल्स, व्हिवो आणि ओप्पोच्या स्मार्टफोनवर मोठी किंमत कपात पाहायला मिळू शकते.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, या वर्षातील सर्वात मोठा फ्लॅगशिप फोन असलेल्या ‘Samsung Galaxy S26 Ultra’ वर मिळणाऱ्या डीलचे अ‍ॅमेझॉनने संकेत दिले आहेत. या फोनची अंतिम किंमत अद्याप गुलदस्त्यात ठेवली असली, तरी सेलच्या तारखेजवळ यावरील धमाकेदार ऑफर जाहीर केली जाईल, ज्यामुळे हा फोन या सेलचा सर्वात मोठा हायलाईट ठरेल.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या