Bajaj Pulsar NS400Z Price Update : पल्सर प्रेमींसाठी बजाज ऑटोने आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीच्या सर्वात शक्तिशाली बाईकपैकी एक असलेल्या Bajaj Pulsar NS400Z च्या किमतीत पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे.
आता या बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.80 लाख रुपये झाली आहे. विशेष म्हणजे, जीएसटी (GST) दरात कपात होऊन तो 18 टक्के झाल्यामुळे ही किमत कमी झाली असून, हाय-परफॉर्मन्स बाईक घेणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे.
Bajaj Pulsar NS400Z : ग्राहकांना होणार दुहेरी फायदा
किंमत कमी झाल्यामुळे केवळ खरेदीवरच नाही, तर इतर ठिकाणीही बचत होणार आहे. एक्स-शोरूम किंमत कमी झाल्याचा थेट परिणाम विमा (Insurance) हप्त्यावर आणि नोंदणी शुल्कावर (Registration Fees) होणार आहे. यामुळे ग्राहकांना एकूण 24,500 रुपयांपर्यंतचा मोठा आर्थिक फायदा मिळू शकतो. 40hp पॉवर देणारी ही सध्या भारतातील सर्वात स्वस्त बाईक ठरली आहे.
Bajaj Pulsar NS400Z : दमदार इंजिन आणि हाय-टेक फीचर्स
Pulsar NS400Z मध्ये 349cc चे लिक्विड-कूल्ड इंजिन असून ते 40.6hp ची पॉवर निर्माण करते. या बाईकच्या फीचर्सची यादी मोठी आहे:
- राईड मोड्स: सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी यात 4 राईड मोड्स दिले आहेत.
- सुरक्षा: ड्युअल-चॅनल एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल आणि रेडियल टायरमुळे रस्त्यावर उत्तम पकड मिळते.
- कनेक्टिव्हिटी: ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह येणारा आधुनिक कन्सोल यात आहे.
- परफॉर्मन्स: क्विक शिफ्टरमुळे गिअर बदलणे अधिक सोपे आणि वेगवान होते.
हे देखील वाचा – Maharashtra Day 2026: 1 मे हाच दिवस महाराष्ट्र दिन म्हणून का साजरा केला जातो? वाचा सविस्तर इतिहास










