Home / लेख / Viral Video: 90 वर्षांच्या सासूला पाठीवर घेऊन सून चालली 9 किलोमीटर; कारण काय? हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल

Viral Video: 90 वर्षांच्या सासूला पाठीवर घेऊन सून चालली 9 किलोमीटर; कारण काय? हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल

Chhattisgarh viral video pension struggle: डिजिटल इंडिया आणि घरपोच सेवांचे मोठे दावे केले जात असताना, ग्रामीण भागातील एक अत्यंत वेदनादायक...

By: Team Navakal
Viral Video: 90 वर्षांच्या सासूला पाठीवर घेऊन सून चालली 9 किलोमीटर; कारण काय? हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल
Social + WhatsApp CTA

Chhattisgarh viral video pension struggle: डिजिटल इंडिया आणि घरपोच सेवांचे मोठे दावे केले जात असताना, ग्रामीण भागातील एक अत्यंत वेदनादायक आणि सरकारी यंत्रणेचे वाभाडे काढणारे चित्र समोर आले आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, जो पाहून जुन्या काळातील ‘विक्रम-वेताळ’च्या गोष्टींची आठवण येते.

या व्हिडिओमध्ये एक महिला कडक उन्हात, जंगलातील खडकाळ रस्ते, ओढे आणि नाले पार करत एका वृद्ध महिलेला आपल्या पाठीवर घेऊन चालताना दिसत आहे.

ही कोणतीही काल्पनिक गोष्ट नसून छत्तीसगडच्या दुर्गम भागातील हक्काच्या पेन्शनसाठीचा एक खरा आणि जिवंत संघर्ष आहे. सरगुजा जिल्ह्यातील मैनपाट परिसरात घडलेल्या या घटनेने ग्रामीण भारतातील सरकारी योजनांच्या अंमलबजावणीवर आणि ग्राउंड रिअॅलिटीवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

Chhattisgarh viral video pension struggle: पेन्शनसाठी ९ किलोमीटरची पायपीट

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, या धाडसी पण हतबल सूनेचे नाव सुखमनिया बाई असे आहे. आपल्या ९० वर्षांच्या वृद्ध सासूला शासकीय पेन्शन मिळावी, यासाठी तिने चक्क ९ किलोमीटरचे अंतर सासूला पाठीवर घेऊन पार केले.

  • दुर्गम रस्ते: हा संपूर्ण परिसर जंगलाने वेढलेला असून येथे वाहतुकीची कोणतीही सोय नाही.
  • नियम आणि सक्ती: वयोवृद्ध सासूला बँकेत प्रत्यक्ष हजर केल्याशिवाय आणि अंगठ्याचे ठसे (फिंगरप्रिंट) किंवा बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन केल्याशिवाय पेन्शनचे पैसे दिले जात नाहीत. याच सरकारी नियमामुळे या कुटुंबाला हा त्रास सहन करावा लागत आहे.

Chhattisgarh viral video pension struggle: व्हिडिओमधील ती संवादाची क्लिप आणि वेदना

हा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीने स्थानिक भाषेत त्या महिलेला विचारले की, तू या वृद्ध माऊलीला एवढ्या लांब पाठीवर घेऊन का चालली आहेस? त्यावर सुखमनिया बाईने दिलेले उत्तर सरकारी व्यवस्थेच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे.

तीने सांगितले की, सासूला बँकेत प्रत्यक्ष नेल्याशिवाय पेन्शनचे पैसे सुटत नाहीत. गावात येण्या-जाण्यासाठी साधी गाडी किंवा रस्ता नाही. जंगलातील चढ-उतारांचे रस्ते आणि पाण्याचे ओढे पार करतच जावे लागते. एवढा जीवघेणा प्रवास केल्यानंतर या कुटुंबाला साधारण 1,500 रुपये पेन्शन मिळते, जी अनेकदा काही महिन्यांची एकत्र दिली जाते. आधी पेन्शनचे पैसे गावातच मिळायचे, पण आता ती व्यवस्था बंद झाल्याने ही दयनीय अवस्था झाल्याचेही तिने सांगितले.

Chhattisgarh viral video pension struggle: डिजिटल इंडियाच्या दाव्यांवर नेटकऱ्यांचे कडक प्रहार

हा व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर युजर्सकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे देश डिजिटल होत असल्याच्या आणि वृद्धांना घरपोच सेवा देण्याच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे अंथरुणाला खिळलेल्या वृद्धांना काही रुपयांसाठी नऊ-नऊ किलोमीटर डोंगर-दऱ्यांतून फिरावे लागत आहे, याबद्दल लोकांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे.

हा व्हिडिओ म्हणजे देशातील आदिवासी आणि दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांच्या पायाभूत सुविधांची झालेली दुरवस्था आणि कागदी कायदे व प्रत्यक्ष वास्तव यामधील दरी दाखवणारा एक जिवंत पुरावा ठरला आहे.

हे देखील वाचा – IPL 2026 Playoff Schedule: आयपीएल प्ले-ऑफचे चित्र स्पष्ट! ‘या’ संघात होणार सामने; पाहा संपूर्ण शेड्युल

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या