Home / महाराष्ट्र / Lohagad Fort Murder Case: लोहगडवरून होणाऱ्या पतीला ढकलणाऱ्या तरुणीने ४ दिवसांपूर्वीच केला होता तसाच प्रयत्न; २,००४ कॉल्सने उघडले गुपित

Lohagad Fort Murder Case: लोहगडवरून होणाऱ्या पतीला ढकलणाऱ्या तरुणीने ४ दिवसांपूर्वीच केला होता तसाच प्रयत्न; २,००४ कॉल्सने उघडले गुपित

Lohagad Fort Murder Case: पुण्याजवळील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर २५ वर्षीय व्यावसायिक केतन अग्रवाल याचा दरीत पडून झालेला मृत्यू हा अपघात...

By: Team Navakal
Lohagad Fort Murder Case: लोहगडवरून होणाऱ्या पतीला ढकलणाऱ्या तरुणीने ४ दिवसांपूर्वीच केला होता तसाच प्रयत्न; २,००४ कॉल्सने उघडले गुपित
Social + WhatsApp CTA

Lohagad Fort Murder Case: पुण्याजवळील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर २५ वर्षीय व्यावसायिक केतन अग्रवाल याचा दरीत पडून झालेला मृत्यू हा अपघात नसून एक अतिशय थंड डोक्याने रचलेला खुनाचा कट होता, असा धक्कादायक खुलासा पुणे ग्रामीण पोलिसांनी केला आहे.

सुरुवातीला केतनचा पाय घसरल्याची माहिती देणाऱ्या त्याच्या २० वर्षीय होणाऱ्या पत्नीनेच (सिया गोयल) आपल्या प्रियकराच्या (चेतन चौधरी) मदतीने केतनला दरीत ढकलल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

या धक्कादायक प्रकरणाचा तपास करताना लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. केतन हा एक अनुभवी ट्रेकर होता, त्यामुळे त्याचा असा अचानक अपघात कसा होऊ शकतो, या संशयावरून पोलिसांनी तपास सुरू केला आणि या संपूर्ण प्रकरणामागील भयानक सत्य समोर आले.

पहिला प्रयत्न फसला, सापाचा बहाणा अन् दुसऱ्यांदा यशस्वी मर्डर प्लॅन

पोलीस चौकशी आणि केतनच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांनुसार, केतनला मारण्याचा हा दुसरा प्रयत्न होता. या प्रकरणातील धक्कादायक खुलासे खालीलप्रमाणे आहेत:

  • १४ जूनचा पहिला अयशस्वी प्रयत्न: केतन आणि सिया १४ जून रोजी लोहगडला गेले होते. तिथे सियाने केतनला कड्यावरून ढकलले होते, परंतु सुदैवाने एका झाडामुळे त्याचा जीव वाचला. तेव्हा सियाने तिथून साप जात होता आणि केतनला वाचवण्यासाठी त्याला ढकलले, अशी खोटी कथा रचली होती.
  • वाढदिवसाचे निमित्त करून पुन्हा बोलावले: केतन या अपघातानंतर पुन्हा तिथे जाण्यास तयार नव्हता. मात्र, सियाने तिचा वाढदिवस साजरा करण्याचे कारण सांगत केतनच्या आईला फोन करून त्याला तयार करण्यास सांगितले. केतनने तिच्या २० जूनच्या वाढदिवसासाठी जयपूरमध्ये मोठे नियोजन केले होते, पण १८ जून रोजीच त्याला पुन्हा लोहगडला नेण्यात आले.
  • प्रियकराची एंट्री आणि थेट मृत्यू: १८ जून रोजी सियासोबत तिचा प्रियकर चेतन चौधरी देखील तिथे पोहोचला. या दोघांनी मिळून केतनला कड्यावरून थेट दरीत ढकलून दिले, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

मोबाईलच्या २,00४ कॉल्स आणि तांत्रिक पुराव्यांनी उडाली झोप

केतनच्या अंत्यसंस्कारानंतर ४ दिवसांनी जेव्हा सिया त्याच्या घरी गेली, तेव्हा केतनच्या बहिणीने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना तिची जीभ घसरली. तिथून कुटुंबाचा संशय बळावला. यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता धक्कादायक डिजिटल पुरावे हाती आले:

  • ६ महिन्यांत २३८ तास संभाषण: सिया आणि चेतन यांच्यात जानेवारी ते जून दरम्यान तब्बल 2,004 वेळा फोनवर संभाषण झाले होते, ज्याचा एकूण कालावधी 238 तास इतका होता.
  • लोकेशन लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न: १८ जून रोजी आरोपी चेतनने सकाळी 7 ते संध्याकाळी 5:40 वाजेपर्यंत आपला इंटरनेट डेटा बंद ठेवला होता. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तो स्वतःचा फोन दुकानात ठेवून कर्मचाऱ्याच्या फोनसह लोहगडला गेला होता, मात्र पोलिसांनी तिथल्या इतर पुराव्यांवरून त्याचे लोकेशन शोधून काढले.

शाही लग्नाची तयारी अन् सर्वकाही संपले

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा असलेल्या केतनच्या लग्नाची जयपूरमधील एका आलिशान राजवाड्यात जोरदार तयारी सुरू होती. त्यांचा ११ फेब्रुवारी रोजी साखरपुडा झाला होता आणि २५ नोव्हेंबर रोजी लग्न ठरणार होते. पाहुण्यांना आणण्यासाठी दोन चार्टर्ड विमाने देखील बुक करण्यात आली होती.

बंडखोर विचारांच्या सियाने आणि तिच्या प्रियकराने स्वतःच्या सुखासाठी एका निष्पाप तरुणाचा जीव घेतला. केतनच्या कुटुंबीयांनी आता दोन्ही आरोपींना थेट फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या