Home / लेख / LPG Cylinder Rules: 1 मे पासून गॅस सिलिंडरच्या नियमात मोठे बदल होण्याची शक्यता; ‘या’ चुका केल्यास कनेक्शन होणार बंद

LPG Cylinder Rules: 1 मे पासून गॅस सिलिंडरच्या नियमात मोठे बदल होण्याची शक्यता; ‘या’ चुका केल्यास कनेक्शन होणार बंद

LPG Cylinder Rules: मे महिना सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले असताना, घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या नियमांमध्ये मोठ्या बदलांची...

By: Team Navakal
LPG Cylinder Rules
Social + WhatsApp CTA

LPG Cylinder Rules: मे महिना सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले असताना, घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या नियमांमध्ये मोठ्या बदलांची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू झालेल्या पश्चिम आशियातील युद्धामुळे जागतिक ऊर्जा क्षेत्रात मोठी टंचाई निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर, भारतीय तेल कंपन्या (IOC, BPCL, HPCL) पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यासाठी मे २०२६ मध्ये नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर करण्याची शक्यता आहे.

किमतीत मोठी वाढ आणि नवीन दर

युद्धाच्या सावलीत इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरच्या किमतीत आधीच ६० रुपयांची वाढ केली आहे. मात्र, व्यावसायिक (१९ किलो) सिलिंडरचा फटका अधिक बसला असून, गेल्या एका महिन्यात तीन वेळा दरवाढ करण्यात आली आहे. एप्रिलमध्ये मेट्रो शहरांमध्ये हे दर १९६ ते २१८ रुपयांनी वाढले असून, १ मे २०२६ रोजी पुन्हा एकदा किमतीत फेरबदल होण्याचे संकेत आहेत.

बुकिंगच्या नियमात बदल

  • लॉक-इन कालावधी: सध्या दोन सिलिंडर बुकिंगमध्ये असलेला २५ दिवसांचा गॅप बदलण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात हा कालावधी ४५ दिवसांपर्यंत असू शकतो.
  • OTP आधारित डिलिव्हरी: गॅस चोरी आणि काळाबाजार रोखण्यासाठी ‘डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड’ अनिवार्य करण्यात येत आहे. सध्या सुमारे ९४% डिलिव्हरी याच पद्धतीने होत आहेत.
  • १००% पुरवठा: युद्धजन्य परिस्थिती असूनही, सरकारने घरगुती गॅस आणि सीएनजीचा १००% पुरवठा सुनिश्चित केला आहे.

ई-केवायसी (eKYC) आणि आधार प्रमाणीकरण

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आधार आधारित प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. जे ग्राहक वर्षाला ७ पेक्षा जास्त सिलिंडर घेतात, त्यांना ८ व्या सिलिंडरपासून सबसिडी मिळवण्यासाठी वर्षातून एकदा बायोमेट्रिक प्रमाणीकरण करणे आवश्यक असेल. ज्या गैर-उज्ज्वला ग्राहकांनी यापूर्वी केवायसी पूर्ण केले आहे, त्यांना पुन्हा प्रक्रिया करण्याची गरज नाही.

पीएनजी (PNG) वापराला प्राधान्य; अन्यथा कनेक्शन कट!

सरकारने आता गॅस सिलिंडरकडून पाईप गॅसकडे (PNG) वळण्यासाठी आक्रमक पावले उचलली आहेत. ज्या भागात पाईप गॅसची सुविधा उपलब्ध आहे, अशा कुटुंबांना तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. जर तीन महिन्यांनंतरही संबंधित कुटुंबाने पीएनजी कनेक्शन घेतले नाही किंवा सिलिंडरचा मोह सोडला नाही, तर त्यांचा एलपीजी पुरवठा कायमचा बंद केला जाईल. मार्च २०२६ पासून आतापर्यंत सुमारे ८ लाख नवीन पीएनजी कनेक्शन्स कार्यान्वित करण्यात आले आहेत.

हे देखील वाचा – 

Virat Kohli Records: विराट कोहलीचा जागतिक विक्रम! IPL मध्ये ‘हा’ टप्पा पूर्ण करणारा पहिला फलंदाज

Nitesh Rane Convicted: चिखलफेक प्रकरण नितेश राणे यांना भोवलं! न्यायालयाने सुनावली 1 महिन्याची शिक्षा; जाणून घ्या नेमकं प्रकरण

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या