Maruti Fronx Base Variant: अनेक मध्यमवर्गीय ग्राहकांचे स्वतःची हक्काची चारचाकी गाडी असावी असे स्वप्न असते. ग्राहकांची हीच गरज ओळखून मारुती सुझुकीने कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये एका किफायतशीर आणि कडक अशा गाडीचा पर्याय दिला आहे. जर तुम्हाला नवीन कोरी एसयूव्ही घ्यायची असेल, पण खिशात एकदम मोठी रक्कम नसेल, तर काळजी करण्याचे कारण नाही.
मारुती फ्रॉन्क्सच्या सर्वात स्वस्त मॉडेलवर सध्या एक जबरदस्त फायनान्स प्लॅन उपलब्ध आहे. सुरुवातीला अवघे 1 लाख रुपयांचे डाउन पेमेंट करून तुम्ही ही कार आपल्या नावावर करू शकता. ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला दरमहा किती रुपयांचा हप्ता द्यावा लागेल आणि व्याजाचा खर्च किती येईल, याचे सविस्तर गणित खालीलप्रमाणे आहे.
काय आहे मारुती फ्रॉन्क्सची किंमत?
मारुती सुझुकी फ्रॉन्क्सच्या बेस व्हेरिएंटचे नाव ‘सिग्मा’ (Sigma) असे आहे. या मॉडेलच्या किमतीचे गणित पुढीलप्रमाणे आहे:
- एक्स शोरूम किंमत: या बेस मॉडेलची मूळ एक्स शोरूम किंमत 6.85 lakh रुपये आहे.
- ऑन रोड किंमत: ही कार खरेदी केल्यास तिची ऑन रोड किंमत सुमारे 7.80 लाख रुपयांपर्यंत जाते.
- इतर खर्च: या ऑन रोड किमतीमध्ये एक्स शोरूम किमतीव्यतिरिक्त साधारण 57,000 रुपये आरटीओ खर्च आणि सुमारे 35,000 रुपये विम्याचा समावेश होतो.
१ लाखाचे डाउन पेमेंट केल्यास किती येईल EMI?
तुम्ही या गाडीचा बेस व्हेरिएंट कर्जावर खरेदी करता, तेव्हा बँका साधारणपणे ऑन रोड किमतीनुसार कर्ज मंजूर करतात. जर तुम्ही सुरुवातीला आपल्या खिशातून 1 लाख रुपयांचे डाउन पेमेंट भरले, तर उर्वरित 6.80 लाख रुपयांची रक्कम तुम्हाला बँकेकडून फायनान्स करून घ्यावी लागेल.
समजा बँकेने तुम्हाला 9 टक्के व्याजदराने पुढील 7 वर्षांसाठी (84 महिने) 6.80 लाख रुपयांचे कार लोन दिले, तर तुम्हाला दरमहा फक्त 10,933 रुपयांचा ईएमआय द्यावा लागेल. पुढील 7 वर्षांपर्यंत तुम्हाला हा ठराविक हप्ता भरावा लागेल.
व्याज मिळून एकूण किती महाग पडेल गाडी?
बँकेकडून 9 टक्के दराने 7 वर्षांसाठी कर्ज घेतल्यास व्याजाचे गणित कसे बदलते ते पाहा:
- एकूण व्याजाची रक्कम: 7 वर्षांच्या कालावधीत तुम्ही बँकेला एकूण कर्जाच्या रकमेवर सुमारे 2.39 लाख रुपये फक्त व्याज म्हणून द्याल.
- एकूण खर्च: कारची ऑन रोड किंमत, तुमचे सुरुवातीचे डाउन पेमेंट आणि 7 वर्षांचे बँकेचे एकूण व्याज हे सर्व एकत्र जोडल्यास, ही कार तुम्हाला एकूण 10.18 लाख रुपयांना पडेल.
हे देखील वाचा – Celebi Aviation Crisis: भारताने एका रात्रीत उद्ध्वस्त केले 500 दशलक्ष डॉलर्सचे साम्राज्य! पाकिस्तानला मदत करणे तुर्कीच्या कंपनीला पडले महाग











