Home / लेख / Pune Railway Station Expansion: पुणेकरांसाठी सर्वात मोठी गूड न्यूज! रेल्वेची क्षमता होणार दुप्पट; आळंदी बनणार नवे ‘महाटर्मिनल’

Pune Railway Station Expansion: पुणेकरांसाठी सर्वात मोठी गूड न्यूज! रेल्वेची क्षमता होणार दुप्पट; आळंदी बनणार नवे ‘महाटर्मिनल’

Pune Railway Station Expansion: पुणे आणि आसपासच्या परिसरातील रेल्वे प्रवाशांसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि मोठा निर्णय घेतला आहे....

By: Team Navakal
Pune Railway Station Expansion: पुणेकरांसाठी सर्वात मोठी गूड न्यूज! रेल्वेची क्षमता होणार दुप्पट; आळंदी बनणार नवे 'महाटर्मिनल'
Social + WhatsApp CTA

Pune Railway Station Expansion: पुणे आणि आसपासच्या परिसरातील रेल्वे प्रवाशांसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि मोठा निर्णय घेतला आहे. पुण्याच्या रेल्वे पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी एका भव्य योजनेची घोषणा करण्यात आली असून, पुढील 1000 दिवसांत शहराची रेल्वे हाताळणी क्षमता थेट दुप्पट केली जाणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या योजनेची माहिती देताना सांगितले की, या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील प्रमुख मार्गांवरील प्रवासी आणि मालवाहतुकीचा वेग कमालीचा वाढणार आहे.

या संपूर्ण प्रस्तावाचा मुख्य उद्देश पुणे रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करणे, उपनगरीय रेल्वे नेटवर्कचा विस्तार करणे आणि शहराच्या विविध भागांमध्ये नवीन टर्मिनल पायाभूत सुविधा निर्माण करणे हा आहे.

पुणे स्टेशनवर प्लॅटफॉर्मची संख्या ६ वरून १२ होणार; असे असेल नवीन नियोजन:

पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी आणि गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रशासनाने पुढीलप्रमाणे मास्टरप्लॅन तयार केला आहे:

  • प्लॅटफॉर्मची संख्या दुप्पट: सध्या पुणे रेल्वे स्थानकावर केवळ 6 प्लॅटफॉर्म आहेत, ज्यांची संख्या वाढवून आता थेट 12 केली जाणार आहे. यामुळे गाड्यांची ये-जा वेगाने होईल आणि आऊटरला गाड्या थांबवून ठेवण्याची समस्या संपेल.
  • देखभाल दुरुस्तीचे काम इतरत्र हलवणार: पुणे स्टेशनवरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे गाड्यांची देखभाल आणि सर्व्हिसिंगचे काम घोरपडी, फुरसुंगी आणि आळंदी येथील केंद्रांवर हलवले जाईल.
  • आळंदी बनणार नवे महाटर्मिनल: आळंदी येथे एक भव्य रेल्वे कोचिंग टर्मिनल उभारले जाणार आहे. यामध्ये तब्बल 9 प्लॅटफॉर्म, 7 पिट लाईन्स आणि 17 स्टॅबलिंग लाईन्स असतील. हे टर्मिनल पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर मुख्य पुणे स्टेशनवरील भार पूर्णपणे हलका होईल.

उपनगरीय स्थानकांचा विकास आणि हाय-स्पीड ट्रेनचे स्वप्न

या केवळ मुख्य स्थानकांचाच नव्हे, तर पुण्याच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे:

  • लोकल स्थानकांचे भाग्य बदलणार: हडपसर, खडकी, शिवाजीनगर आणि घोरपडी या उपनगरीय स्थानकांचा विकास केला जाणार आहे. येथे अतिरिक्त प्लॅटफॉर्म आणि स्टॅबलिंग लाईन्स तयार करून लोकल आणि इंटरसिटी गाड्यांची संख्या वाढवली जाईल.
  • राज्यांतर्गत कनेक्टिव्हिटी वाढणार: हे अपग्रेडेशन पूर्ण झाल्यानंतर पुलाला थेट कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राशी जोडणाऱ्या नवीन गाड्या सुरू केल्या जातील.
  • बुलेट ट्रेनची तयारी: दीर्घकालीन नियोजनाचा भाग म्हणून मुंबई ते पुणे दरम्यान हाय-स्पीड बुलेट ट्रेन कॉरिडॉर प्रस्तावित आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास मुंबई-पुणे प्रवास अवघ्या १ तासापेक्षा कमी वेळेत पूर्ण होईल.

औद्योगिक क्षेत्राला गती आणि मालवाहतुकीसाठी नवा कॉरिडॉर

या योजनेमध्ये प्रवाशांइतकेच मालवाहतुकीलाही मोठे प्राधान्य देण्यात आले आहे. जेएनपीटी आणि वाढवण सारख्या देशातील प्रमुख बंदरांना जोडणारा एक स्वतंत्र मालवाहतूक कॉरिडॉर विकसित केला जाणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक क्षेत्रांमधून मालाची वाहतूक करणे सोपे होईल, वाहतूक खर्च कमी होईल आणि पुढील दशकात महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठे लॉजिस्टिक हब म्हणून उदयास येईल.

हे देखील वाचा – Lohagad Fort Murder Case: लोहगडवरून होणाऱ्या पतीला ढकलणाऱ्या तरुणीने ४ दिवसांपूर्वीच केला होता तसाच प्रयत्न; २,००४ कॉल्सने उघडले गुपित

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या