Home / देश-विदेश / CBSE Class 12 Result: 95.2 टक्क्यांवर समाधान नाही, रांचीच्या अवनीने घेतला ‘हा’ निर्णय; फेरमूल्यांकनात मिळाले 500 पैकी 500 गुण

CBSE Class 12 Result: 95.2 टक्क्यांवर समाधान नाही, रांचीच्या अवनीने घेतला ‘हा’ निर्णय; फेरमूल्यांकनात मिळाले 500 पैकी 500 गुण

CBSE Class 12 Result: झारखंडची राजधानी रांची येथील एका विद्यार्थिनीने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता 12 वीच्या बोर्ड परीक्षेत...

By: Team Navakal
CBSE Class 12 Result: 95.2 टक्क्यांवर समाधान नाही, रांचीच्या अवनीने घेतला 'हा' निर्णय; फेरमूल्यांकनात मिळाले 500 पैकी 500 गुण
Social + WhatsApp CTA

CBSE Class 12 Result: झारखंडची राजधानी रांची येथील एका विद्यार्थिनीने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता 12 वीच्या बोर्ड परीक्षेत एक अभूतपूर्व चमत्कार करून दाखवला आहे. पुनर्मूल्यांकनाचा (री-इव्हॅल्युएशन) पर्याय निवडल्यानंतर या विद्यार्थिनीला 500 पैकी 500 पूर्ण गुण मिळाले असून, ती देशातील वाणिज्य (कॉमर्स) शाखेतील सर्वोच्च गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यादीत सामील झाली आहे.

धुरवा येथील ‘दिल्ली पब्लिक स्कूल’ (डीपीएस) मध्ये शिकणाऱ्या अवनी केजरीवाल हिचा इयत्ता 12 वीचा निकाल 13 मे रोजी जाहीर झाला होता. तेव्हा तिला 95.2 टक्के गुण मिळाले होते. या गुणांवर तिचे कुटुंब आनंदी होते, परंतु अवनी स्वतःच्या कामगिरीवर पूर्ण समाधानी नव्हती. तिला खात्री होती की तिचे पेपर आणखी चांगले तपासले गेले पाहिजेत. याच आत्मविश्वासाच्या जोरावर तिने उत्तरपत्रिकांच्या फेरमूल्यांकनासाठी अर्ज केला आणि तिचा हा निर्णय संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.

पाचही मुख्य विषयांमध्ये पैकीच्या पैकी गुण; अशी आहे अवनीची गुणपत्रिका

फेरमूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अवनीचे गुण वाढले आणि तिने सर्व विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून एक नवा विक्रम प्रस्थापित केला. तिच्या गुणांचे गणित खालीलप्रमाणे आहे:

  • पाच मुख्य विषयांमध्ये १००% गुण: अवनीने कॉमर्स शाखेच्या पाचही मुख्य विषयांमध्ये म्हणजेच इंग्रजी, अकाउंटन्सी, बिझनेस स्टडीज, इकॉनॉमिक्स आणि अप्लाईड मॅथेमॅटिक्स या सर्व विषयांमध्ये 100 पैकी 100 गुण मिळवले.
  • अतिरिक्त विषयातही उत्तम कामगिरी: या पाच विषयांव्यतिरिक्त तिच्याकडे ग्राफिक्स हा अतिरिक्त विषय होता, ज्यामध्ये तिने 99 गुण मिळवले आहेत.
  • यशाचे श्रेय: “निकालाच्या दिवशी मी गुणांवर समाधानी नव्हते. वर्षभर केलेल्या कष्टावर माझा पूर्ण विश्वास होता,” असे अवनीने सांगितले. तिने आपल्या या यशाचे श्रेय आई-वडील, शिक्षक आणि मार्गदर्शक सचित सर यांना दिले आहे.

अभ्यासाची हटके रणनीती; सोशल मीडियाबाबत दिला मोलाचा सल्ला

अवनीच्या या यशाचे रहस्य तिच्या अभ्यासाच्या पद्धतीत दडलेले आहे. तिने इतर विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत:

  • तास मोजून नाही, तर टारगेट ठेवून अभ्यास: अवनी कधीही अभ्यासाचे तास मोजून बसत नव्हती. तिने रोजचे एक उद्दिष्ट (टारगेट) निश्चित केले होते. दिवसातून 2 ते 3 ठरवलेले टॉपिक पूर्ण झाल्याशिवाय ती अभ्यास थांबवत नव्हती, मग त्यासाठी कितीही वेळ लागो.
  • सोशल मीडियाचा मर्यादित वापर: आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर अत्यंत जबाबदारीने आणि मर्यादित स्वरूपात केला पाहिजे, जेणेकरून अभ्यासावर त्याचा कोणताही वाईट परिणाम होणार नाही, असा सल्ला तिने दिला.

भविष्यात बिझनेसमन बनण्याचे स्वप्न; शाळेला सार्थ अभिमान

अवनी ही व्यावसायिक मितेश केजरीवाल आणि गृहिणी पूनम केजरीवाल यांची मुलगी आहे. तिला बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रात उच्च शिक्षण घ्यायचे असून तिने आधीच ‘सीयूपीटी-यूजी २०२६’ (CUET-UG) प्रवेश परीक्षा दिली आहे. भविष्यात स्वतःचा मोठा उद्योग सुरू करून एक यशस्वी उद्योजक बनण्याचे तिचे स्वप्न आहे.

तिच्या या घवघवीत यशाबद्दल डीपीएस रांचीच्या प्राचार्या डॉ. जया चौहान यांनी तिचे अभिनंदन केले आहे. “अवनीचे हे यश तिची जिद्द, एकाग्रता आणि योग्य मार्गदर्शनाचे फळ आहे. तिच्या या कामगिरीमुळे केवळ शाळेचेच नाव उज्ज्वल झाले नाही, तर इतर हजारो विद्यार्थ्यांनाही यातून सर्वोत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल,” असे प्राचार्यांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा – Lohagad Fort Murder Case: लोहगडवरून होणाऱ्या पतीला ढकलणाऱ्या तरुणीने ४ दिवसांपूर्वीच केला होता तसाच प्रयत्न; २,००४ कॉल्सने उघडले गुपित

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या