Redmi A7 Pro 5G India price specifications : भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये बजेट सेगमेंटमध्ये आपली पकड अधिक घट्ट करण्यासाठी रेडमीने आपला नवीन ‘Redmi A7 Pro 5G’ भारतात अधिकृतपणे लाँच केला आहे. जागतिक बाजारात पदार्पण केल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांतच हा फोन भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध झाला आहे. मोठी स्क्रीन आणि जबरदस्त बॅटरी बॅकअप हे या फोनचे मुख्य आकर्षण आहे.
किंमत आणि उपलब्धता
Redmi A7 Pro 5G भारतात दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे:
- 4GB + 64GB: 11,499 रुपये
- 4GB + 128GB: 12,499 रुपये
हा फोन ब्लॅक, मिस्ट ब्लू आणि सनसेट ऑरेंज अशा तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असून, 15 एप्रिलपासून तो फ्लिपकार्ट आणि शाओमीच्या अधिकृत वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.
Redmi A7 Pro 5G चे खास फीचर्स
- डिस्प्ले: फोनमध्ये 6.9-इंचाचा मोठा एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो, ज्यामुळे व्हिडिओ आणि गेमिंगचा अनुभव अधिक स्मूथ होतो. याची कमाल ब्राइटनेस 800 निट्स इतकी आहे.
- परफॉर्मन्स: यात युनिसॉक T8300 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 16 वर आधारित हायपर ओएस 3 वर चालतो. विशेष म्हणजे, कंपनीने याला 4 वर्षांचे अँड्रॉइड अपडेट्स आणि 6 वर्षांचे सुरक्षा पॅचेस देण्याचे आश्वासन दिले आहे.
- बॅटरी: या फोनमध्ये 6,300mAh ची मोठी बॅटरी आहे, जी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. याशिवाय यामध्ये रिव्हर्स वायर्ड चार्जिंगची सुविधाही देण्यात आली आहे.
- कॅमेरा: फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस 32-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे, तर सेल्फीसाठी 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
एआय फीचर्सचा समावेश
बजेट स्मार्टफोन असूनही रेडमीने यामध्ये ‘सर्कल टू सर्च’ आणि ‘जेमिनी’ सारखी आधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) फीचर्स दिली आहेत. धुळीपासून आणि पाण्याचे हलके थेंब उडाल्यास फोन सुरक्षित राहावा यासाठी याला IP52 रेटिंग मिळाले आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात 5G, वाय-फाय 5, ब्लूटूथ 5.4 आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे.










