Home / लेख / JioTV Pro Pack Launch: रिलायन्स जिओचा अवघ्या ५५ रुपयांचा नवा प्लॅन; मिळणार १००० पेक्षा जास्त लाईव्ह टीव्ही चॅनेल्स; पाहा डिटेल्स

JioTV Pro Pack Launch: रिलायन्स जिओचा अवघ्या ५५ रुपयांचा नवा प्लॅन; मिळणार १००० पेक्षा जास्त लाईव्ह टीव्ही चॅनेल्स; पाहा डिटेल्स

JioTV Pro Pack Launch: रिलायन्स जिओने भारतीय दूरसंचार बाजारात आपल्या ग्राहकांसाठी एक नवा एंटरटेनमेंट-बेस्ड रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. जर...

By: Team Navakal
JioTV Pro Pack Launch: रिलायन्स जिओचा अवघ्या ५५ रुपयांचा नवा प्लॅन; मिळणार १००० पेक्षा जास्त लाईव्ह टीव्ही चॅनेल्स; पाहा डिटेल्स
Social + WhatsApp CTA

JioTV Pro Pack Launch: रिलायन्स जिओने भारतीय दूरसंचार बाजारात आपल्या ग्राहकांसाठी एक नवा एंटरटेनमेंट-बेस्ड रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. जर तुम्हाला मोबाईलवर टीव्ही चॅनेल्स किंवा मालिका पाहण्याची आवड असेल, तर कंपनीने खास तुमच्यासाठी हा प्लॅन डिझाईन केला आहे. या प्लॅनचे नाव ‘जियोटीव्ही प्रो पॅक’ (JioTV Pro Pack) असे असून, याद्वारे ग्राहकांना जिओटीव्ही मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून 1,000 पेक्षा जास्त लाईव्ह टीव्ही चॅनेल्स पाहता येणार आहेत.

हा नवा प्लॅन जिओच्या प्रीपेड आणि पोस्टपेड अशा दोन्ही प्रकारच्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, ग्राहकांनी एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की, या ५५ रुपयांच्या रिचार्जमध्ये कॉलिंग, डेटा किंवा एसएमएस (SMS) चे कोणतेही फायदे समाविष्ट केलेले नाहीत. हा केवळ एक डिजिटल कंटेन्टचा अतिरिक्त पॅक आहे.

महिन्याभराची व्हॅलिडिटी आणि १५० हून अधिक प्रीमियम चॅनेल्स

जिओच्या या नव्या ५५ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना मनोरंजनाचे अनेक पर्याय मिळतात:

  • ३० दिवसांची व्हॅलिडिटी: या प्लॅनची वैधता पूर्ण 30 दिवसांची आहे. याद्वारे युजर्स आपल्या स्मार्टफोनवर 16 पेक्षा जास्त भाषांमधील चॅनेल्सचा आनंद घेऊ शकतात.
  • प्रीमियम चॅनेल्सचा समावेश: या पॅकमध्ये 150 पेक्षा जास्त प्रीमियम चॅनेल्स समाविष्ट आहेत. यामध्ये स्टार प्लस एचडी, कलर्स एचडी, सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन एचडी, डिस्कव्हरी आणि अ‍ॅनिमल प्लॅनेट यांसारख्या लोकप्रिय चॅनेल्सचा समावेश आहे.
  • मोठ्या ब्रॉडकास्टर्सची साथ: जिओस्टार, सोनी एंटरटेनमेंट, सन टीव्ही नेटवर्क, वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी आणि ईटीव्ही यांसारख्या मोठ्या नेटवर्क्सचे चॅनेल्स या ५५ रुपयांच्या पॅकमध्ये ग्राहकांना पाहता येतील.

महत्त्वाची नोंद: खेळ प्रेमींसाठी या प्लॅनमध्ये एक मर्यादा आहे. या ऑफर अंतर्गत जिओस्टार आणि सोनी नेटवर्कचे ‘लाईव्ह स्पोर्ट्स चॅनेल्स’ (थेट क्रीडा प्रक्षेपण) पाहता येणार नाहीत.

अ‍ॅक्टिव्हेशनची कटकट नाही; एकाच वेळी अनेक रिचार्ज करण्याची सुविधा

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या ५५ रुपयांच्या प्लॅनसाठी ग्राहकांना कोणतीही वेगळी अ‍ॅक्टिव्हेशन प्रक्रिया करण्याची गरज पडणार नाही. ऑनलाईन किंवा ऑफलाईन माध्यमातून 55 रुपयांचा रिचार्ज यशस्वी झाल्यानंतर, युजर्स थेट आपल्या मोबाईलमधील जिओटीव्ही अ‍ॅप उघडू शकतात. तिथे स्वतःचा जिओ मोबाईल नंबर टाकून लॉगिन करताच सर्व प्रीमियम चॅनेल्स त्वरित सुरू होतील.

हा प्लॅन सध्या अ‍ॅक्टिव्ह जिओ कनेक्शन असलेल्या ग्राहकांसाठी एका वेळी एकाच मोबाईल डिव्हाइसवर वापरता येईल. विशेष म्हणजे, ग्राहक या पॅकचे एकाच वेळी अनेक अ‍ॅडव्हान्स रिचार्ज देखील करून ठेवू शकतात. तुम्ही एकापेक्षा जास्त रिचार्ज केल्यास ते रांगेत (क्यूमध्ये) राहतील आणि चालू असलेल्या पहिल्या 30 दिवसांची व्हॅलिडिटी संपल्यानंतर पुढील रिचार्ज आपोआप अ‍ॅक्टिव्ह होईल.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या