Royal Enfield Bullet 650: भारतीय दुचाकी बाजारात रॉयल एनफिल्डच्या गाड्यांना एका वेगळाच मान आहे, त्यातही ‘बुलेट’ या नावाभोवती ग्राहकांचे एक वेगळेच भावनिक नाते जडलेले आहे. जर तुम्हीही गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या आणि अधिक शक्तिशाली बुलेटच्या प्रतीक्षेत असाल, तर तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. रॉयल एनफिल्ड आपली बहुप्रतिक्षित ‘रॉयल एनफिल्ड बुलेट ६५०’ भारतीय बाजारात उतरवण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे.
कंपनीने अद्याप अधिकृत लाँच तारीख जाहीर केली नसली, तरी कंपनीच्या भारतीय डिजिटल रिटेल प्रणालीमध्ये आणि अधिकृत वेबसाईटवर या बाईकचे पेज लाईव्ह झाले आहे. या पेजवर बाईकचे रंग, तांत्रिक वैशिष्ट्ये आणि बुकिंगचे पर्याय देखील दिसू लागले आहेत, ज्यामुळे ही बाईक अगदी काही दिवसांतच रस्त्यांवर धावताना दिसेल असे संकेत मिळत आहेत.
Royal Enfield Bullet 650: कधी होणार लाँच आणि किती असेल किंमत?
ऑटोमोबाईल क्षेत्रातील विश्लेषक आणि मीडिया रिपोर्टसनुसार, या बाईकच्या लाँचिंगचे गणित खालीलप्रमाणे असू शकते:
- संभाव्य लाँच तारीख: सध्याच्या हालचाली पाहता, ही बाईक जून 2026 मध्ये किंवा त्याआधीही भारतीय बाजारात अधिकृतपणे विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकते.
- अंदाजित किंमत: भारतीय बाजारपेठेत या दमदार बाईकची एक्स-शोरूम किंमत 2.80 लाख रुपयांपासून ते 2.90 लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Royal Enfield Bullet 650: मीडियामध्ये हालचालींना वेग
या बाईकच्या लाँचिंगची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी ऑटो जगतातील नामांकित रिव्ह्यूअर्स आणि मीडिया हाउसेसकडे या बाईकचे चाचणी युनिट्स पोहोचू लागले आहेत. जेव्हा एखाद्या गाडीचे मीडिया रिव्ह्यू युनिट्स बाजारात फिरू लागतात, तेव्हा तिचे कमर्शियल लाँचिंग अगदी तोंडावर आलेले असते, हा आजवरचा पॅटर्न राहिला आहे. त्यामुळे आता बुलेटप्रेमींची प्रतीक्षा संपल्यात जमा आहे.
कशी असेल नवीन बुलेट ६५०?
नवीन ६५० सीसी बुलेटमध्ये रॉयल एनफिल्डच्या इतर फ्लॅगशिप गाड्यांप्रमाणेच शक्तिशाली पॅरेलल-ट्विन इंजिन पाहायला मिळेल, जे रायडर्सना हायवेवर एक उत्कृष्ट आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देईल.
डिजिटल सिस्टीम: बाईकची बुकिंग सिस्टीम कंपनीने आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आधीच तयार करून ठेवली असल्याने, लाँचिंग होताच ग्राहकांना तात्काळ बुकिंग करता येणार आहे.
डिझाईन आणि लुक: या बाईकमध्ये बुलेटचा पारंपरिक रेट्रो लुक कायम ठेवण्यात आला आहे, परंतु आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन ती आधीपेक्षा अधिक मजबूत आणि देखणी बनवण्यात आली आहे.
हे देखील वाचा – Vaibhav Sooryavanshi IPL Record: 15 वर्षांच्या पोराचा धमाका! ख्रिस गेलचा सर्वात मोठा रेकॉर्ड मोडत वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास











