Home / लेख / Samsung Galaxy S25 FE वर अ‍ॅमेझॉनने दिली मोठी सूट; 14 हजार रुपयांची बचत करण्याची शेवटची संधी

Samsung Galaxy S25 FE वर अ‍ॅमेझॉनने दिली मोठी सूट; 14 हजार रुपयांची बचत करण्याची शेवटची संधी

Samsung Galaxy S25 FE Discount: तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून ५०,००० रुपयांच्या बजेटमध्ये एक उत्तम ऑल-राउंडर ५जी स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार...

By: Team Navakal
Samsung Galaxy S25 FE वर अ‍ॅमेझॉनने दिली मोठी सूट; 14 हजार रुपयांची बचत करण्याची शेवटची संधी
Social + WhatsApp CTA

Samsung Galaxy S25 FE Discount: तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून ५०,००० रुपयांच्या बजेटमध्ये एक उत्तम ऑल-राउंडर ५जी स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? तर मग तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. प्रसिद्ध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर सॅमसंगचा लोकप्रिय प्रीमियम फोन ‘सॅमसंग गॅलेक्सी एस२५ एफई’ अतिशय कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सर्वोत्तम गॅलेक्सी एआय (AI) फीचर्ससह लाँच झालेल्या या फोनवर सध्या तब्बल 14,000 रुपये मिळवण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे. सॅमसंगचा हा फोन प्रगत कॅमेरा क्वालिटी, शानदार डिस्प्ले आणि दीर्घकाळाच्या सॉफ्टवेअर सपोर्टसाठी ओळखला जातो.

Samsung Galaxy S25 FE Discount: अ‍ॅमेझॉनवरील ऑफर आणि किमतीचे गणित

भारतीय बाजारपेठेत सॅमसंग गॅलेक्सी एस२५ एफई या फोनची मूळ किंमत 59,999 रुपयांपासून सुरू होते. मात्र, अ‍ॅमेझॉनच्या सध्याच्या डीलमध्ये ग्राहकांसाठी पैशांची मोठी बचत होत आहे:

  • फ्लॅट डिस्काउंट: अ‍ॅमेझॉनवर हा स्मार्टफोन सध्या थेट 11,664 रुपयांच्या घसरणीसह अवघ्या 48,335 रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे.
  • बँक ऑफर: जर तुम्ही खरेदी करताना ‘अ‍ॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँक’ क्रेडिट कार्डचा वापर केला, तर तुम्हाला 2,417 रुपयांची अतिरिक्त सूट मिळते.
  • एकूण प्रभावी बचत: या दोन्ही ऑफर्स एकत्र केल्यास फोनवर एकूण १४,००० रुपयांपर्यंतचा फायदा मिळतो. याशिवाय जुना फोन बदलून नवीन फोन घेणाऱ्यांसाठी एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे.

Samsung Galaxy S25 FE Discount: दमदार परफॉर्मन्स आणि गॅलेक्सी एआय फीचर्स

या स्मार्टफोनमध्ये सॅमसंगचे प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय फीचर्स देण्यात आले आहेत, जे रोजची कामे सोपी करतात. फोनच्या इतर तांत्रिक बाजू खालीलप्रमाणे आहेत:

  • डिसप्ले आणि सुरक्षा: फोनमध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी प्लस अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे. स्क्रीन अधिक स्मूथ चालण्यासाठी यात 120Hz चा रिफ्रेश रेट आणि 1,900 निट्सची ब्राइटनेस मिळते. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी गोरिल्ला ग्लास व्हिक्टस प्लसचे संरक्षण आणि धूळ-पाण्यापासून बचावासाठी IP68 रेटिंग दिली आहे.
  • प्रोसेसर: उत्तम कामगिरी आणि भारी गेमिंगसाठी या फोनमध्ये शक्तिशाली एक्सिनोस 2400 प्रोसेसर वापरण्यात आला आहे.
  • बॅटरी आणि चार्जिंग: फोनमध्ये 4,900 mAh क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली असून, ती 45W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

Samsung Galaxy S25 FE Discount: प्रो-ग्रेड ट्रिपल कॅमेरा सेटअप

फोटोग्राफीसाठी या फोनच्या मागील बाजूला तीन कॅमेऱ्यांचा सेटअप मिळतो. यामध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य प्रायमरी कॅमेरा, 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 3x झूम क्षमतेसह 8 मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा समाविष्ट आहे. रील बनवण्यासाठी आणि सेल्फीसाठी समोरच्या बाजूला 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा – Karnataka Political Crisis: कर्नाटक राजकारणात मोठा भूकंप! मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजीनामा देण्याची शक्यता; डीके शिवकुमार यांच्याकडे सत्ता?

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या