Home / महाराष्ट्र / CJP Protest : लडाखमध्ये सोनम वांगचुक यांच्या १९ दिवसांच्या उपोषणाला मुंबईतून मोठे बळ!; कोणत्याही राजकीय नेत्याशिवाय आझाद मैदानावर पेटला विद्यार्थ्यांच्या संतापाचा वणवा..

CJP Protest : लडाखमध्ये सोनम वांगचुक यांच्या १९ दिवसांच्या उपोषणाला मुंबईतून मोठे बळ!; कोणत्याही राजकीय नेत्याशिवाय आझाद मैदानावर पेटला विद्यार्थ्यांच्या संतापाचा वणवा..

CJP Protest : देशातील शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी आणि भ्रष्टाचारमुक्त परीक्षा पद्धतीची कठोर अंमलबजावणी व्हावी या प्रमुख मागणीसाठी आज...

By: Team Navakal
CJP Protest
Social + WhatsApp CTA

CJP Protest : देशातील शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी आणि भ्रष्टाचारमुक्त परीक्षा पद्धतीची कठोर अंमलबजावणी व्हावी या प्रमुख मागणीसाठी आज मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानावर तरुणांचा मोठा एल्गार पाहायला मिळाला. ‘कॉक्रोच जनता पार्टी, मुंबई’च्या वतीने या भव्य एकदिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धा परीक्षा आणि विविध शासकीय भरती प्रक्रियांमध्ये सातत्याने समोर येणाऱ्या गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. याच अन्यायाविरोधात न्याय मागण्यासाठी मुंबई आणि परिसरातून आलेल्या सुमारे एक ते दीड हजार तरुणांनी या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

आज सकाळी ठीक १० वाजता आझाद मैदानावर या आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन परीक्षा प्रक्रियेतील घोटाळे आणि प्रशासकीय अनास्थेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गेल्या काही महिन्यांपासून देशात विविध शैक्षणिक व स्पर्धा परीक्षांच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या परीक्षा पद्धतीमधील त्रुटी आणि पेपरफुटीच्या घटनांमुळे देशभरातील लाखो प्रामाणिक विद्यार्थी, त्यांचे चिंताग्रस्त पालक आणि वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे परीक्षार्थी यांच्यात तीव्र असंतोष व अस्वस्थतेचे वातावरण आहे. हाच संताप आज तरुणांनी आपल्या घोषणांमधून व्यक्त केला.

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला मुंबईतून जाहीर पाठिंबा
या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय पातळीवरील आंदोलनाचा प्रामुख्याने उल्लेख केला. नीट (NEET) परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात आणि शिक्षणमंत्र्यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी लडाखचे ख्यातनाम पर्यावरण व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या १९ दिवसांपासून दिल्लीत आमरण उपोषणाला बसले आहेत. इतके दिवस उलटूनही केंद्र सरकारने अद्याप त्यांच्या या जीवन-मरणाच्या लढ्याची आणि मागण्यांची साधी दखलही घेतलेली नाही, असा तीव्र आरोप आंदोलनकर्त्या तरुणांनी केला. वांगचुक यांच्या या संघर्षाला बळ देण्यासाठी आणि त्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवण्यासाठीच मुंबईत या विशेष निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आल्याचे समन्वयकांनी सांगितले.

कोणत्याही राजकीय नेत्याशिवाय आंदोलन; ‘छिछोरे’ फेम अभिनेता रंजन राज मैदानात
या आंदोलनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रस्थापित राजकीय पक्षाच्या नेत्याला किंवा लोकप्रतिनिधीला निमंत्रित करण्यात आले नव्हते. हे आंदोलन पूर्णपणे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालवलेले व्यासपीठ होते. राजकीय नेते नसले तरी, तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेला आणि ‘छिछोरे’ या लोकप्रिय चित्रपटात ‘अभिमन्यु राठौर’ (डंडा) ही गाजलेली भूमिका साकारणारा प्रसिद्ध अभिनेता रंजन राज याने प्रत्यक्ष आझाद मैदानावर येऊन या आंदोलनाला आपला सक्रिय पाठिंबा दिला.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या