Home / महाराष्ट्र / Gulabrao Patil : गुलाबराव पाटलांची तोफ थेट भाजपवर डागली! गुवाहाटीचा उठाव विसरू नका, नाहीतर युतीचं भविष्य; गुलाबराव पाटलांचा भाजपला इशारा…

Gulabrao Patil : गुलाबराव पाटलांची तोफ थेट भाजपवर डागली! गुवाहाटीचा उठाव विसरू नका, नाहीतर युतीचं भविष्य; गुलाबराव पाटलांचा भाजपला इशारा…

Gulabrao Patil : विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना यांच्यातील...

By: Team Navakal
Gulabrao Patil
Social + WhatsApp CTA

Gulabrao Patil : विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना यांच्यातील अंतर्गत धुसफूस अद्यापही शमलेली नाही. एकीकडे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची समजूत काढण्यात वरिष्ठ नेत्यांना यश आले असले, तरी दुसरीकडे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मनातील नाराजी मात्र कायम आहे. जळगावची हक्काची जागा भाजपने आपल्याकडे घेतल्यामुळे गुलाबराव पाटील कमालीचे संतप्त झाले असून, याच पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपच्या केंद्रीय व राज्यस्तरीय नेतृत्वाला अत्यंत कडक शब्दांत सुनावले आहे.

माध्यमांशी संवाद साधताना पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. अब्दुल सत्तार यांच्या नाराजीबाबत बोलताना ते म्हणाले की, स्थानिक पातळीवरील राजकीय गणिते आणि कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन सत्तार यांनी आपली भूमिका मांडली होती; त्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने मध्यस्थी करून त्यांची नाराजी दूर केली आहे, ही सकारात्मक बाब आहे. परंतु, त्याच वेळी महायुतीमधील जागावाटपाच्या सुसंवादावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी भाजपला एका महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनेची आठवण करून दिली. “आम्ही तत्कालीन परिस्थितीत धाडस दाखवून गुवाहाटीचा ऐतिहासिक उठाव केला नसता, तर आज राज्यातील राजकीय परिस्थिती काय असती?” असा थेट आणि सूचक सवाल त्यांनी उपस्थित केला. महायुतीत भाजपने ‘मोठ्या भावाची’ भूमिका बजावताना लहान भावासारख्या असणाऱ्या मित्रपक्षांच्या अस्तित्वाकडे आणि त्यांच्या हक्काच्या जागांकडे दुर्लक्ष करू नये, उलट त्यांची अधिक काळजी घ्यावी, अशी सर्वच घटक पक्षांची प्रामाणिक अपेक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या संवादादरम्यान गुलाबराव पाटील यांनी नाशिकमधील बदलत्या राजकीय समीकरणांवर आणि संभाव्य बंडखोरीवरही चिंता व्यक्त केली. नाशिकच्या जागेवरून जर युतीमध्ये धुसफूस होऊन बंडखोरीची परिस्थिती निर्माण होत असेल, तर ते महायुतीच्या भविष्यातील आरोग्यासाठी आणि आगामी निवडणुकांसाठी अजिबात भूषणावह नाही, असा गंभीर इशारा त्यांनी दिला.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या