Vaibhav Sooryavanshi IPL 2026 : भारतीय क्रिकेटला एक नवा उगवता तारा मिळाला असून त्याच्या धडाकेबाज फलंदाजीने सध्या क्रीडा विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशी याने आयपीएल 2026 च्या हंगामात आपल्या बॅटने असा काही गदर माजवला की, दिग्गजांनीही त्याच्यासमोर मान टेकवली आहे.
सध्या राजस्थान रॉयल्ससोबत वार्षिक 1.10 कोटी रुपयांच्या करारावर असलेल्या वैभवला पुढील आयपीएल लिलावापर्यंत मानधनात वाढ मिळवण्यासाठी कदाचित आणखी एक वर्ष वाट पाहावी लागेल. मात्र, मैदानाबाहेर त्याचा भाव आत्ताच वधारला आहे. जाहिरात क्षेत्रातील तज्ञांच्या मते, आयपीएलमधील चमकदार कामगिरीनंतर वैभवने आपल्या ब्रँड एंडोर्समेंट फीमध्ये मोठी वाढ केली आहे.
Vaibhav Sooryavanshi IPL 2026 : आयपीएल २०२६ मधील स्वप्नवत कामगिरी
वैभव सूर्यवंशीसाठी हा हंगामा अत्यंत ऐतिहासिक ठरला. त्याने संपूर्ण स्पर्धेत आपल्या खेळाचा दर्जा दाखवत खालील मोठे टप्पे पार केले:
- धावांचा पाऊस: या हंगामात त्याने एकूण 776 धावा कुटल्या.
- झंझावाती स्ट्राईक रेट: विशेष म्हणजे या धावा त्याने 237.30 च्या अवाढव्य स्ट्राईक रेटने बनवल्या.
- मोठ्या पुरस्कारांवर नाव: या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याने प्रतिष्ठित ‘ऑरेंज कॅप’ आपल्या नावावर केली आणि त्याला ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर’ म्हणूनही गौरवण्यात आले.
क्रीडा विश्वातील तज्ञांच्या मते, जर हा खेळाडू भविष्यात पुन्हा कधी लिलावात उतरला, तर त्याच्यावर तब्बल 30 कोटी रुपयांपर्यंतची बोली लागू शकते.
Vaibhav Sooryavanshi IPL 2026 : जाहिरातींचे मानधन पोहोचले २ कोटींवर
वैभवचा भाव वाढल्यामुळे अनेक मोठे ब्रँड्स त्याला आपल्या जाहिरातींमध्ये घेण्यासाठी उत्सुक आहेत. सध्या त्याची आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्स आणि त्याचे आई-वडील मिळून त्याचे जाहिरात पोर्टफोलिओ सांभाळत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएल सुरू होण्यापूर्वी वैभवने काही बड्या कंपन्यांसोबत प्रत्येकी सुमारे 1 कोटी रुपयांचे करार केले होते. यामध्ये कॉम्प्लॅन आणि रेड बुल यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश होता. मात्र, आता त्याने आपली फी थेट 1.5 ते 2 कोटी रुपये प्रति जाहिरात इतकी वाढवली आहे. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी एवढी मोठी झेप घेणारा तो पहिलाच तरुण क्रिकेटपटू ठरला आहे.
Vaibhav Sooryavanshi IPL 2026 : तज्ञांचा संयम राखण्याचा सल्ला
वैभव सूर्यवंशीच्या या अफाट टॅलेंटमुळे क्रिकेट जगतातील अनेक माजी खेळाडू आणि तज्ञांनी याची तुलना थेट सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि सुनील गावस्कर यांच्यासारख्या महान खेळाडूंशी करण्यास सुरुवात केली आहे.
जरी त्याच्या बॅटिंगमध्ये मोठी ताकद असली, तरी त्याचे करिअर आता कुठे सुरू झाले आहे. त्यामुळे त्याच्या व्यवस्थापन टीमने आणि पालकांनी पैशांच्या आणि प्रसिद्धीच्या या झगमगाटात वाहून न जाता अत्यंत सावधपणे पावले टाकणे गरजेचे आहे, असा सल्लाही क्रिकेट तज्ञांनी दिला आहे.
हे देखील वाचा – West Bengal Political Crisis: बंगालमध्ये ‘ठाकरे-शिंदे’ पॅटर्नची पुनरावृत्ती? तृणमूलच्या 60 आमदारांच्या बंडामुळे ममता बॅनर्जी अडचणीत









