Home / महाराष्ट्र / Pimpri Chinchwad Building Collapse: मोशी कचरा डेपो दुर्घटना; ढिगाऱ्याखालून 10 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश

Pimpri Chinchwad Building Collapse: मोशी कचरा डेपो दुर्घटना; ढिगाऱ्याखालून 10 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश

Pimpri Chinchwad Building Collapse: पिंपरी-चिंचवडमधील मोशी भागात असलेल्या कचरा डेपोच्या परिसरात एक अतिशय भीषण दुर्घटना घडली. येथील एका इमारतीचा मोठा...

By: Team Navakal
Pimpri Chinchwad Building Collapse: मोशी कचरा डेपो दुर्घटना; ढिगाऱ्याखालून १० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश
Social + WhatsApp CTA

Pimpri Chinchwad Building Collapse: पिंपरी-चिंचवडमधील मोशी भागात असलेल्या कचरा डेपोच्या परिसरात एक अतिशय भीषण दुर्घटना घडली. येथील एका इमारतीचा मोठा हिस्सा अचानक पत्त्यांसारखा कोसळला. या दुर्घटनेच्या वेळी तिथे काम करत असलेले सुमारे 15 ते 20 कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवड परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनासह अग्निशमन दल, पोलीस, एनडीआरएफ (NDRF) आणि लष्कराचे (आर्मी) जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी संपूर्ण यंत्रणा रात्रीपासूनच युद्धपातळीवर काम करत आहे. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी देखील रात्री घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला.

“खालून आवाज येत आहेत, आम्ही चहा-बिस्किटं पोहोचवली”; गिरीश महाजन यांनी दिली माहिती

घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना रेस्क्यू ऑपरेशनबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती दिली:

  • १० जणांना काढले बाहेर: मदतकार्य करणाऱ्या जवानांनी आतापर्यंत ढिगाऱ्याखालून 10 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे.
  • अडकलेल्यांशी थेट संपर्क: ढिगाऱ्याखाली अडकलेल्या काही कामगारांशी अग्निशमन दलाच्या जवानांनी थेट संपर्क साधला आहे. त्यातील 3 जणांशी जवानांनी प्रत्यक्ष संवाद साधला असून त्यांना हाताने चहा आणि बिस्किटे देखील खाऊ घातली आहेत.
  • मलब्याखाली अडकले पाय: ढिगाऱ्याखालून बोलताना या कामगारांनी त्यांचे पाय इमारतीच्या जड मलब्याखाली अडकल्याचे जवानांना सांगितले आहे.
  • सकाळपर्यंत चालणार मोहीम: आतमध्ये आणखी काही जण जिवंत असून त्यांचे बोलण्याचे आवाज येत आहेत, पण जवानांना ते अद्याप दिसलेले नाहीत. जेसीबी किंवा मोठ्या यंत्रांचा वापर करताना इमारत पुन्हा कोसळण्याचा धोका आहे, त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक काम करावे लागत आहे. हे काम सकाळपर्यंत सलग सुरू राहील, पण प्रत्येकाला सुखरूप बाहेर काढू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एकूण २० जण अडकल्याचा अंदाज; महापालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घटनास्थळावरून परिस्थिती स्पष्ट करताना सांगितले की, ढिगाऱ्याखाली एकूण 20 जण अडकल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात तात्काळ 4 जणांना बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर जवानांनी आणखी 6 लोकांना ढिगाऱ्याबाहेर काढले. विशेष म्हणजे यातील काही लोक स्वतःच्या पायाने चालत बाहेर आले. या सर्व 6 जणांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आणि उत्तम आहे. सध्याच्या गणितानुसार, आता ढिगाऱ्याखाली आणखी 10 जण असण्याची शक्यता असून त्यांना शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या संपूर्ण मोहिमेवर महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त (CP), स्थानिक आमदार आणि महापौर स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून लक्ष ठेवून आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या