Home / महाराष्ट्र / Watermelon Death Case : दक्षिण मुंबईतील डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूचे गूढ वाढले; एफडीएच्या अहवालात कलिंगडात भेसळ नसल्याचे स्पष्ट

Watermelon Death Case : दक्षिण मुंबईतील डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूचे गूढ वाढले; एफडीएच्या अहवालात कलिंगडात भेसळ नसल्याचे स्पष्ट

Watermelon Death Case : दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात गेल्या आठवड्यात घडलेल्या एकाच कुटुंबातील चौघांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता एक नवीन...

By: Team Navakal
Watermelon Death Case :
Social + WhatsApp CTA

Watermelon Death Case : दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात गेल्या आठवड्यात घडलेल्या एकाच कुटुंबातील चौघांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता एक नवीन आणि अत्यंत धक्कादायक वळण मिळाले आहे. डोकाडिया कुटुंबातील आई, वडील आणि त्यांच्या दोन लहान मुलींचा २५ एप्रिल रोजी रात्री कलिंगड खाल्ल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. सुरुवातीला कलिंगडातून झालेल्या विषबाधेमुळे (Food Poisoning) हा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु, आता अन्न व औषध प्रशासनाचा (FDA) अधिकृत तपासणी अहवाल आणि मृतांचा प्राथमिक फॉरेन्सिक अहवाल समोर आल्यामुळे या मृत्यूचे गूढ अधिकच गडद झाले आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) अहवालात कलिंगड शुद्ध-
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी डोकाडिया कुटुंबाच्या घरातून अन्नपदार्थांचे एकूण ११ नमुने जप्त करून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. यामध्ये कलिंगड, बिर्याणी, फ्रिजमधील व माठातील पाणी, कच्चा आणि शिजवलेला भात, कच्चे व शिजवलेले चिकन, खजूर आणि विविध मसाल्यांचा समावेश होता. अन्न व औषध प्रशासनाने नुकत्याच सादर केलेल्या अहवालानुसार, या सर्व अन्नपदार्थांमध्ये आणि विशेषतः कलिंगडात कोणताही कृत्रिम रंग, अतिरिक्त गोडवा आणणारे घटक अथवा रासायनिक भेसळ आढळलेली नाही. त्यामुळे फळांमधील भेसळीमुळे या कुटुंबाचा मृत्यू झाल्याची शक्यता आता पूर्णपणे मावळली आहे.

फॉरेन्सिक अहवालातील धक्कादायक खुलासे-
कलिंगड आणि इतर खाद्यपदार्थ शुद्ध असल्याचे स्पष्ट झाले असले, तरी फॉरेन्सिक (फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी) चाचणीच्या प्राथमिक अहवालात अत्यंत धक्कादायक निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत. शवविच्छेदनानंतर प्राप्त झालेल्या माहितीनुसार, डोकाडिया कुटुंबातील चारही मृतांचा मेंदू, हृदय आणि आतडी यांसारखे महत्त्वाचे अंतर्गत अवयव चक्क हिरवट रंगाचे पडल्याचे आढळून आले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, सर्वसाधारण अन्नातून होणाऱ्या विषबाधेमध्ये (Food Poisoning) शरीराच्या अंतर्गत अवयवांची अशी स्थिती कधीही होत नाही.

मृत्यूचे गूढ आणखी वाढले-
एकाच वेळी शरीरातील अनेक प्रमुख अवयव हिरवट पडणे हे तीव्र स्वरूपाच्या रासायनिक किंवा घातक विषाचा प्रादुर्भाव झाल्याचे दर्शवते. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरात अत्यंत जहाल विष पसरते, तेव्हाच अंतर्गत अवयवांमध्ये असे बदल घडून येतात, असा निष्कर्ष तज्ज्ञांनी काढला आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ अन्नातून झालेली विषबाधा नसून, यामागे काहीतरी वेगळे आणि गंभीर कारण असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कलिंगडात कोणतीही भेसळ न आढळल्यामुळे आता पोलिसांचे संपूर्ण लक्ष पुढील सखोल बॅक्टेरियल चाचण्या आणि रासायनिक विश्लेषणाच्या अंतिम अहवालाकडे लागले आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या