Home / लेख / Mango Rabri Falooda Recipe : घरीच बनवा सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर स्पेशल ‘मँगो रबडी फालुदा’; पाहा सोपी रेसिपी

Mango Rabri Falooda Recipe : घरीच बनवा सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर स्पेशल ‘मँगो रबडी फालुदा’; पाहा सोपी रेसिपी

Mango Rabri Falooda Recipe : येत्या 21 जून रोजी साजरा होणाऱ्या फादर्स डे निमित्त आपल्या आयुष्यातील खऱ्या सुपरहिरोला म्हणजेच बाबांना...

By: Team Navakal
Mango Rabri Falooda Recipe : घरीच बनवा सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर स्पेशल 'मँगो रबडी फालुदा'; पाहा सोपी रेसिपी
Social + WhatsApp CTA

Mango Rabri Falooda Recipe : येत्या 21 जून रोजी साजरा होणाऱ्या फादर्स डे निमित्त आपल्या आयुष्यातील खऱ्या सुपरहिरोला म्हणजेच बाबांना काहीतरी खास आणि गोड सरप्राईज देण्याची उत्तम संधी आहे. प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ आणि मास्टरशेफ इंडियाचे जज कुणाल कपूर यांनी सोशल मीडियावर त्यांची एक खास आणि सिग्नेचर रेसिपी शेअर केली आहे.

उन्हाळ्याचा ऋतू आणि आंब्याचा सीझन लक्षात घेऊन त्यांनी ‘मँगो रबडी फालुदा’ बनवण्याचा एक मस्त पर्याय सुचवला आहे.

शेफ कुणाल कपूर यांच्या मते, रसाळ आंबे, मऊ फालुदा शेवया, सबजा आणि क्रीमी आईस्क्रीमने सजवलेला हा फालुदा बाबांप्रती असलेले प्रेम आणि आदर व्यक्त करण्याचा सर्वात गोड मार्ग आहे. घरच्या घरी हॉटेलसारखा कडक फालुदा कसा तयार करायचा, याचे साहित्य आणि सोपी कृती खालीलप्रमाणे आहे.

मँगो रबडी फालुदा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

हा शाही फालुदा बनवण्यासाठी तुम्हाला खालील गोष्टींची आवश्यकता असेल:

१. मलाईदार रबडीसाठी (२५० ग्रॅम):

  • फुल फॅट दूध – 1 लिटर
  • साखर – 2.5 मोठे चमचे
  • वेलची पावडर – 1 लहान चमचा
  • गुलाब पाणी – 1 मोठा चमचा

२. मँगो फालुदा शेवयांसाठी:

  • आंब्याची प्युरी – 0.5 कप
  • व्हॅनिला कस्टर्ड पावडर – 1 कप
  • पिठीसाखर – 2 मोठे चमचे
  • पाणी – 2 कप
  • बर्फाचे तुकडे आणि 1 लिटर थंड पाणी (फालुदा थंड करण्यासाठी)

३. फालुदा सजवण्यासाठी :

  • रोझ सिरप आणि भिजवलेला सबजा
  • व्हॅनिला आईस्क्रीम
  • बारीक चिरलेला आंबा
  • टुटी फ्रुटी आणि बारीक चळलेले ड्रायफ्रूट्स (बदाम, काजू, पिस्ता)

फालुदा तयार करण्याची सोपी कृती

हा खास डिझर्ट बनवण्याची पद्धत अतिशय सोपी असून ती दोन मुख्य भागांमध्ये विभागली आहे:

स्वादिष्ट रबडी अशी बनवा:

  • सर्वप्रथम एका पॅनमध्ये 1 लिटर फुल फॅट दूध गरम करायला ठेवा.
  • कमी आचेवर दूध चांगले उकळवून ते मूळ प्रमाणाच्या १/४ होईपर्यंत आटवून घ्या आणि त्यात साखर टाका.
  • दूध चांगले घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. त्यानंतर त्यात वेलची पावडर आणि थोडे गुलाब पाणी घालून मिश्रण थंड होऊ द्या.

आंब्याचा फालुदा तयार करा:

  • आंब्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये त्याची गुळगुळीत प्युरी बनवून घ्या.
  • या प्युरीमध्ये कस्टर्ड पावडर, पिठीसाखर आणि पाणी घालून गुठळ्या राहणार नाहीत अशा पद्धतीने चांगले फेटून घ्या.
  • आता हे मिश्रण मंद आचेवर पॅनमध्ये घट्ट होईपर्यंत शिजवा. मिश्रण चमच्याला चिकटू लागले की गॅस बंद करा.
  • हे गरम मिश्रण फालुदा मेकर किंवा शेवेच्या साच्यात भरा आणि बर्फाच्या थंडगार पाण्यात साचा दाबून फालुदा शेवया पाडा. या शेवया थंड पाण्यात 5 मिनिटे सेट होऊ द्या. (टीप: साचा नसेल तर हे मिश्रण ताटात १ सेमी जाडीचे पसरवून थंड झाल्यावर त्याचे लहान चौकोनी तुकडे करा.)

काचेच्या ग्लासमध्ये असा सजवा ‘मँगो रबडी फालुदा’

एक मोठा काचेचा ग्लास घ्या. सर्वात खाली आधी थोडे रोझ सिरप टाका. त्यावर तयार केलेली थंडगार रबडी आणि नंतर आंब्याचा फालुदा किंवा तुकडे घाला. यानंतर भिजवलेला सबजा आणि आंब्याचे बारीक काप टाका. शेवेटी वरून व्हॅनिला आईस्क्रीमचा एक मोठा स्कूप ठेवून त्यावर टुटी फ्रुटी आणि सुक्या मेव्याचे काप टाकून थंडगार सर्व्ह करा.

हे देखील वाचा – Ragi Idli Recipe: नाश्त्याला नेहमीचेच पदार्थ खाऊन कंटाळलात? नाचणीपासून बनवा मऊ आणि लुसलुशीत इडली; पाहा सोपी पद्धत

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या