Home / मनोरंजन / Dhurandhar 2 OTT Release : चाहत्यांची प्रतीक्षा संपली! रणवीर सिंगचा ‘धुरंधर २’ ओटीटीवर येतोय; रिलीज डेट आणि प्लॅटफॉर्मबाबत मोठे अपडेट

Dhurandhar 2 OTT Release : चाहत्यांची प्रतीक्षा संपली! रणवीर सिंगचा ‘धुरंधर २’ ओटीटीवर येतोय; रिलीज डेट आणि प्लॅटफॉर्मबाबत मोठे अपडेट

Dhurandhar 2 OTT Release : मार्च 2026 मध्ये प्रदर्शित झाल्यापासून रणवीर सिंगच्या ‘धुरंधर: द रिव्हेंज’ (Dhurandhar: The Revenge) या चित्रपटाने...

By: Team Navakal
Dhurandhar 2 OTT Release
Social + WhatsApp CTA

Dhurandhar 2 OTT Release : मार्च 2026 मध्ये प्रदर्शित झाल्यापासून रणवीर सिंगच्या ‘धुरंधर: द रिव्हेंज’ (Dhurandhar: The Revenge) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. जगभरातील अनेक विक्रम मोडीत काढल्यानंतर, आता हा स्पाय थ्रिलर चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि भारतात हा चित्रपट वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.

ओटीटी स्ट्रीमिंगचे तपशील

नेटफ्लिक्सच्या अधिकृत माहितीनुसार, ‘धुरंधर २’ आंतरराष्ट्रीय स्तरावर 14 मे 2026 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. काही देशांमध्ये वेळेतील फरकामुळे तो 15 मे रोजी उपलब्ध होईल. ओटीटी व्हर्जनमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांसाठी अधिक खास असणार आहे. याचे मुख्य आकर्षण म्हणजे चित्रपटाचा रनटाइम जवळजवळ 3 तास आणि 52 मिनिटे असेल, ज्यामध्ये अनसेन्सर्ड दृश्ये आणि काही अतिरिक्त फुटेज पाहायला मिळू शकतात.

भारतात कधी आणि कुठे होणार रिलीज?

भारतातील प्रेक्षकांसाठी ही स्ट्रीमिंग तारीख थोडी वेगळी असू शकते. रिपोर्टनुसार, ‘धुरंधर २’ भारतात 14 मे रोजी ‘जिओहॉटस्टार’ (JioHotstar) वर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. निर्मात्यांनी अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.

चित्रपटातील ‘तिरछी टोपीवाले’ गाण्याच्या रिमिक्सवरून (रंग दे लाल) निर्माण झालेल्या वादादरम्यान, निर्मात्यांनी न्यायालयात माहिती दिली की, चित्रपट मे महिन्याच्या मध्यापर्यंत ओटीटीवर येण्याची अपेक्षा आहे. थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यापासून साधारण 8 ते 10 आठवड्यांनी चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर येतो, त्यानुसार 14 मे ही तारीख महत्त्वाची ठरत आहे.

बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई

आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाने कमाईचे सर्व इमले सर केले आहेत. 7 आठवड्यांनंतरही हा चित्रपट थिएटरमध्ये भक्कम कामगिरी करत आहे.

  • भारतातील एकूण कमाई: 1,140.67 कोटी रुपये (नेट).
  • जागतिक स्तरावर एकूण कमाई: 1,791.55 कोटी रुपये.
  • परदेशातील कमाई: 426.35 कोटी रुपये.

तगडी स्टारकास्ट

या चित्रपटात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत असून सारा अर्जुन, अर्जुन रामपाल, आर. माधवन, राकेश बेदी आणि संजय दत्त यांसारख्या दिग्गज कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

हे देखील वाचा – Hantavirus vs Corona: हंता व्हायरस कोरोनासारखा वेगाने पसरू शकतो का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…

Web Title:
संबंधित बातम्या