Home / महाराष्ट्र / Bacchu Kadu Praises Tukaram Mundhe: “सरकार जे करू शकले नाही, ते …”; विधानपरिषदेत बच्चू कडू यांनी जाहीरपणे मानले तुकाराम मुंढेंचे आभार

Bacchu Kadu Praises Tukaram Mundhe: “सरकार जे करू शकले नाही, ते …”; विधानपरिषदेत बच्चू कडू यांनी जाहीरपणे मानले तुकाराम मुंढेंचे आभार

Bacchu Kadu Praises Tukaram Mundhe: विधानपरिषदेच्या सभागृहात आपल्या नेहमीच्या तडाखेबंद शैलीत बोलताना शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी अन्न व औषध...

By: Team Navakal
Bacchu Kadu Praises Tukaram Mundhe: "सरकार जे करू शकले नाही, ते ..."; विधानपरिषदेत बच्चू कडू यांनी जाहीरपणे मानले तुकाराम मुंढेंचे आभार
Social + WhatsApp CTA

Bacchu Kadu Praises Tukaram Mundhe: विधानपरिषदेच्या सभागृहात आपल्या नेहमीच्या तडाखेबंद शैलीत बोलताना शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कामगिरीचा गौरव केला. सरकारला जे अनेक वर्षे जमले नाही, ते एका सनदी अधिकाऱ्याने करून दाखवले, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी मुंढेंच्या कामाची पावती दिली.

मुंढेंच्या कडक शिस्तीमुळे ग्रामीण भागातील गुटखा विक्री पूर्णपणे ठप्प झाली असून, त्यांनी आता आपला मोर्चा दुधातील भेसळखोरांकडे वळवावा, अशी मागणी कडू यांनी केली.

मुंढेंचे कौतुक करताना कडू म्हणाले की, जर त्यांनी आणखी थोडे चांगले काम केले, तर दुधाला योग्य भाव मिळण्यास मदत होईल. त्यामुळे त्यांना याच पदावर कायम ठेवणे गरजेचे आहे. यासोबतच कडू यांनी दुधातील वाढत्या भ्रष्टाचारावर बोट ठेवत, यामुळे होणाऱ्या गंभीर आजारांकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

५0 टक्के दुधात भेसळ; कर्करोगाचा धोका १५ टक्क्यांनी वाढला

दुधाच्या व्यवसायात सुरू असलेल्या काळ्याबाजारावर बच्चू कडू यांनी अत्यंत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला:

  • शेतकऱ्यांचे नुकसान: दुधातील भ्रष्टाचार आणि भेसळ पूर्णपणे थांबली, तर शेतकऱ्यांना कधीही दुधाच्या भावासाठी सरकारकडे मागणी करावी लागणार नाही, असा दावा त्यांनी केला.
  • कॅन्सरचे वाढते प्रमाण: सध्या बाजारात येणाऱ्या एकूण दुधापैकी जवळपास 50 टक्के दुधात भेसळ केली जात आहे. या विषारी दुधामुळे समाजात कॅन्सरचे प्रमाण 10 ते 15 टक्क्यांनी वाढले असून निष्पाप लोकांचा जीव जात आहे.
  • आपले सरकार असले तरी गप्प बसणार नाही: सत्ताधारी पक्षाचे आमदार असूनही कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “सरकार आपले आहे म्हणून शांत बसा, असे सांगणाऱ्यांपैकी आम्ही नाही. एक शेतकरी पुत्र म्हणून मी हा आवाज उठवत राहीन,” असे ते म्हणाले.

‘अनाथांचा नाथ एकनाथ’; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे मानले आभार

आपल्या भाषणादरम्यान बच्चू कडू यांनी दिव्यांग बांधवांसाठी केलेल्या कामाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले. रायगडाच्या पायथ्याशी तीन दिवस केलेल्या आंदोलनाची आठवण करून देत ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला आणि दिव्यांगांचा मासिक भत्ता थेट 2,500 रुपये केला.

जगातील पहिले स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करून एकनाथ शिंदे यांनी आपण खऱ्या अर्थाने अनाथांचे नाथ असल्याचे सिद्ध केले आहे, अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांची स्तुती केली.

शेतकऱ्यांना कमी लेखणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मानगुटीवर छत्रपतींची तलवार!

शेतकरी कर्जमाफी आणि हक्कांच्या लढ्यासाठी केलेल्या संघर्षाचा पाढा वाचताना कडू यांचा पारा कमालीचा चढला होता. त्यांनी ७ दिवसांचे आंदोलन, 550 किलोमीटरचा पायी प्रवास, महाराष्ट्रातील 350 सभा आणि तब्बल 75,000 किलोमीटरच्या दौऱ्याचा उल्लेख केला.

कर्जमाफी देताना काही प्रशासकीय अधिकारी ‘शेतकऱ्यांना किती द्यायचे?’ अशी तुच्छतेची भाषा वापरतात, असे कडू यांनी सांगितले. अशी भाषा ऐकल्यावर पुन्हा एकदा हातात छत्रपतींची तलवार घेऊन अशा अधिकाऱ्यांचे हात छाटून टाकावेत, असा संताप अंगात संचारतो, अशी आक्रमक विधाने त्यांनी सभागृहात केली.

हे देखील वाचा – Lohagad Fort Murder Case: लोहगडवरून होणाऱ्या पतीला ढकलणाऱ्या तरुणीने ४ दिवसांपूर्वीच केला होता तसाच प्रयत्न; २,००४ कॉल्सने उघडले गुपित

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या