Home / मनोरंजन / Raja Shivaji Movie: १०० कोटींचे बजेट अन् १० वर्षांची मेहनत! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’चे शूटिंग नक्की कुठे झाले? पाहा

Raja Shivaji Movie: १०० कोटींचे बजेट अन् १० वर्षांची मेहनत! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’चे शूटिंग नक्की कुठे झाले? पाहा

Raja Shivaji Movie: मराठी चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतचा सर्वात भव्य आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकताच...

By: Team Navakal
Raja Shivaji Movie
Social + WhatsApp CTA

Raja Shivaji Movie: मराठी चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतचा सर्वात भव्य आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांमध्ये याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. रितेश देशमुखच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, या ऐतिहासिक महाकाव्याचे चित्रीकरण कुठे झाले आहे, याची माहिती आता समोर आली आहे.

महाराष्ट्रातील ‘या’ ऐतिहासिक ठिकाणी झाले चित्रीकरण

छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम मोठ्या पडद्यावर वास्तववादी दिसावा, यासाठी महाराष्ट्रातील विविध नैसर्गिक आणि ऐतिहासिक ठिकाणांची निवड करण्यात आली होती:

  • सातारा जिल्हा: सातारा जिल्ह्यातील महुली संगम या ऐतिहासिक ठिकाणी चित्रपटाचे महत्त्वाचे भाग चित्रित करण्यात आले आहेत.
  • महाबळेश्वर आणि वाई: थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरसह वाईमधील निसर्गरम्य आणि ऐतिहासिक स्थळांवर काही महत्त्वाचे सीन शूट झाले आहेत.
  • सह्याद्रीच्या रांगा: महाराजांचे किल्ले आणि सह्याद्रीच्या दुर्गम दऱ्याखोऱ्यांमध्ये या भव्य चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे.
  • मुंबई: मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रनगरी (फिल्म सिटी) आणि परिसरातील तलावांच्या ठिकाणी काही विशेष भागांचे शूटिंग पार पडले आहे.

दिग्गज कलाकारांची मांदियाळी

या चित्रपटात स्वतः रितेश देशमुख शिवरायांची मुख्य भूमिका साकारत असून, त्यानेच या सिनेमाचे दिग्दर्शन, लेखन आणि निर्मितीची धुरा सांभाळली आहे. चित्रपटामध्ये संजय दत्त, विद्या बालन, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री आणि जिनिलिया देशमुख यांसारखे तगडे कलाकार पाहायला मिळणार आहेत. गेली १० वर्षे या प्रकल्पावर काम सुरू असून प्रत्यक्ष शूटिंग गेल्या ३-४ वर्षांपासून सुरू होते.

१०० कोटींचे बजेट अन् जागतिक प्रदर्शन

‘जिओ स्टुडिओज’ आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ यांच्या संयुक्त विद्यमाने तयार झालेला हा चित्रपट मराठीतील सर्वाधिक बजेट असणारा (१०० कोटी) चित्रपट ठरला आहे. ज्योती देशपांडे आणि जिनिलिया देशमुख यांनी याची निर्मिती केली आहे. १ मे २०२६ रोजी हा चित्रपट मराठी, हिंदी आणि तेलुगू अशा तीन भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे. इतिहासाची भव्यता आणि वास्तवता प्रत्येक फ्रेममध्ये उतरवण्याचा प्रयत्न या सिनेमात करण्यात आला आहे.

हे देखील वाचा – 

Manoj Jarange Patil : “तुझे तुकडे होतील!”; गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या वाल्मिक कराड गँगवर जरांगे पाटील कडाडले

PM Modi vs Kharge: “मोदी हे दहशतवादी आहेत!” मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानाने खळबळ; निवडणूक आयोगाची नोटीस

Web Title:
संबंधित बातम्या