अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के

काबूल- अफगाणिस्तानमध्ये आज पहाटे ५.४४ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ४.२ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचे केंद्र जमिनीपासून १२४ किलोमीटर खोल होते, अशी माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली आहे. या भूकंपात कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. अफगाणिस्तानमध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल इतकी होती. सततच्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top