शाहरुख खानच्या मुलाला क्लिनचीट देणारे संजय सिंहांच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी

मुंबई – कॉर्डेलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला क्लिनचीट देणारे अंमली पदार्थविरोधी पथकाचे (एनसीबी) माजी उप महासंचालक संजय कुमार सिंह यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत.
संजय कुमार सिंह हे ओडिशा कॅडरचे १९९६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. कॉर्डेलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणात त्यांनी आर्यन खान याला क्लिनचीट दिल्यापासून ते वादात आले आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे.
आर्यन खान याच्या विरोधात एनसीबीने २ ऑक्टोबर २०२१ रोजी अंमली पदार्थ बाळगणे आणि सेवन करण्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. संजय सिंह यांनी या प्रकरणात आर्यन खान याला क्लिनचीट दिली.
२०२३ साली संजय सिंह यांनी आपल्या मुलाला नवी मुंबईतील एका नामवंत वैद्यकीय महाविद्यालयात व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून दिला होता. त्यासाठी त्यांनी तब्बल १ कोटी २५ लाख रुपये फी भरली होती. त्याचबरोबर ३५ लाख रुपये अतिरिक्त फी भरली होती. त्याआधी सिंह यांनी २०२२ मध्ये राजस्थानच्या जयपूरमधील एका वैद्यकीय महाविद्यालयात आपल्या याच मुलाला प्रवेश मिळवून दिला होता. तिथे एक वर्ष शिकल्यानंतर त्याला कमी गुण मिळाले. त्यामुळे त्यांनी नवी मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयात त्याला प्रवेश मिळवून दिला. हे पैसे सिंह यांच्या उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोतांपेक्षा कितीतरी पट अधीक आहे,अशी तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने गृहमंत्रालयाने त्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सिंह यांनी मुंबई एनसीबीमध्ये नियुक्ती मिळाल्यानंतर नवी मुंबईत ४ बेडरुमचा एक आलिशान फ्लॅट खरेदी केल्याच्या प्रकरणाचीही चौकशी केली जाणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top