अमेरिकेत बेपत्ता भारतीय तरुण विद्यापीठाच्या आवारात मृतावस्थेत

वॉशिंग्टन :

अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठात शिक्षण घेत असलेला भारतीय विद्यार्थी नील आचार्य मृतावस्थेत आढळून आला. नील बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या आईने रविवारी केल्यानंतर काही तासांतच त्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. नील आचार्य हा पर्ड्यू विद्यापीठाच्या जॉन मार्टिनसन ऑनर्स कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्स आणि डेटा सायन्समध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत होता.

रविवारी नीलची आई गौरी आचार्य यांनी एक्स या सोशल मीडियावर एका पोस्टमधून आपल्याला मुलाला शोधण्याचे आवाहन केले होते. “आमचा मुलगा नील आचार्य २८ जानेवारीपासून बेपत्ता आहे. तो अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठात शिकत आहे. त्याला पर्ड्यू विद्यापीठात सोडणाऱ्या उबर ड्रायव्हरने त्याला शेवटचे पाहिले होते. तुम्हाला काहीही माहिती असल्यास कृपया आम्हाला मदत करा.”

या पोस्टला उत्तर देताना शिकागो येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने म्हटले की, “वाणिज्य दूतावास पर्ड्यू विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांच्या आणि नीलच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे. वाणिज्य दूतावास सर्व शक्य सहकार्य आणि मदत करेल.” पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. दरम्यान या आठवड्याच्या सुरुवातीला, अमेरिकेतील जॉर्जिया प्रांतातील लिथोनिया इथे एका दुकानात एका माणसाने हातोड्याने वार करून एका भारतीय विद्यार्थ्याची निर्घृणपणे हत्या केली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top