अयोध्येत भाविकांसाठी ‘टेन्ट सिटी’८० हजार लोकांच्या निवासाची सोय

अयोध्या

अयोध्या येथील रामजन्मभूमीवर बांधण्यात येणाऱ्या राममंदिरात येत्या २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी टेन्ट सिटी तयार करण्यात येत आहे. या तंबूंमध्ये सुमारे ८० हजार भाविकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यानुसार गुप्तार घाट येथे २० एकर परिसरात टेन्ट सिटी उभारली जाणार असून तिथे २० ते २५ हजार भाविकांच्या निवासाची सोय होणार आहे.

त्याचबरोबर अयोध्या धाम येथील ब्रह्मकुंड परिसरात ३० हजार, बाग बिगेसी भागात २५ एकर जागेत २५ हजार भाविकांची राहण्याची सोय करण्यात येणार आहे. याशिवाय कारसेवकपुरम, मणिरामदास छावणी भागात देखील भाविकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. दरम्यान, राममंदिरातील तळमजल्याच्या अठरा दरवाजांवर सोन्याची कलाकुसर केली जाणार आहे. या मंदिरातील तळमजल्याचे काम पूर्ण झाले आहे. २२ जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर दुसऱ्याच दिवशी राम मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले होणार आहे. तळमजल्यावरील गर्भगृहात रामलल्लाची मूर्ती विराजमान होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top