अर्षदिप, आवेशने आफ्रिकेला 116 धावांत गुंडाळले पहिल्याच वनडेत भारताचा आफ्रिकेवर मोठा विजय

जोहान्सबर्ग – आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना अवघ्या 27.3 षटकात 116 धावात भारतीय गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली. सलामीवीर हेन्ड्रिक आणि पाठोपाठ वंडर दुसेन या दोघांना अर्षदिपने खातेही खोलू दिले नाही. तर आवेश खानने कर्णधार मार्करमचा 12 धावांवर त्रिफळा उडवला. आफ्रिकेचा भरवशाचा फलंदाज क्लासेन याला अर्षदिपने 6 धावांवर माघारी धाडले. पीच हिटर मिलरला आवेश खानने खेळपट्टीवर उभेच राहू दिले नाही. त्याला 2 धावांवर बाद केले. त्यानंतर खेळपट्टीचा चिकटलेला दुसरा सलामीवीर झोरजी याला अर्षदिपने 28 धावांवर बाद केले. तळाचा फेल्युक्वयो फटकेबाजी करीत होता, पण अर्षदिपने त्याला 33 धावांवर पायचीत केले.
मुलडेर 0, बर्गर 7, शम्सी 11 आणि केशव महाराज 4 हे झटपट बाद झाले आणि आफ्रिकेचा डाव 116 धावांवर आटोपला. अर्षदिपने 37 धावांमध्ये 5, तर आवेश खानने 27 धावांमध्ये 4 बळी घेतले. भारतासाठी टार्गेट छोटे होते. पण सलामीवीर ऋतुराज गायकवाड याला म्यूल्डरने 5 धावांवर बाद केले, पण सुदर्शनने नाबाद 55 तर श्रेयस अय्यरने 45 धावात 52 धावा केल्या. टिळक वर्मा व सुदर्शन नाबाद राहिले. त्यामुळे भारताला आफ्रिकेवर 8 गडी राखून विजय मिळवता आला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना अवघ्या 27.3 षटकात 116 धावात भारतीय गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली. सलामीवीर हेन्ड्रिक आणि पाठोपाठ वंडर दुसेन या दोघांना अर्षदिपने खातेही खोलू दिले नाही. तर आवेश खानने कर्णधार मार्करमचा 12 धावांवर त्रिफळा उडवला. आफ्रिकेचा भरवशाचा फलंदाज क्लासेन याला अर्षदिपने 6 धावांवर माघारी धाडले. पीच हिटर मिलरला आवेश खानने खेळपट्टीवर उभेच राहू दिले नाही. त्याला 2 धावांवर बाद केले. त्यानंतर खेळपट्टीचा चिकटलेला दुसरा सलामीवीर झोरजी याला अर्षदिपने 28 धावांवर बाद केले. तळाचा फेल्युक्वयो फटकेबाजी करीत होता, पण अर्षदिपने त्याला 33 धावांवर पायचीत केले.
मुलडेर 0, बर्गर 7, शम्सी 11 आणि केशव महाराज 4 हे झटपट बाद झाले आणि आफ्रिकेचा डाव 116 धावांवर आटोपला. अर्षदिपने 37 धावांमध्ये 5, तर आवेश खानने 27 धावांमध्ये 4 बळी घेतले. भारतासाठी टार्गेट छोटे होते. पण सलामीवीर ऋतुराज गायकवाड याला म्यूल्डरने 5 धावांवर बाद केले, पण सुदर्शनने नाबाद 55 तर श्रेयस अय्यरने 45 धावात 52 धावा केल्या. टिळक वर्मा व सुदर्शन नाबाद राहिले. त्यामुळे भारताला आफ्रिकेवर 8 गडी राखून विजय मिळवता आला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top