कोटक महिंद्रा बँकेचे दोन दिवसांत 47,000 कोटी रुपयांचे नुकसान

मुंबई – भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठी कारवाई केल्यानंतर कोटक महिंद्रा बँकेचे दोन दिवसांत या बँकेच्या शेअरमध्ये १३ टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली. यामुळे गुंतवणूकदारांना मोठे नुकसान झाले आहे.तर बँकेचे 47,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरमध्ये गुरुवारी १० टक्यांनी घसरण झाली. तर शुक्रवारी या बँकेच्या शेअरमध्ये २ टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली. या बँकेच्या शेअरची किंमत १,६१४.७० रुपयांवर आली आहे.

गुरुवारी आणि शुक्रवारी कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरमध्ये घसरण झाल्याने बँकेच्या मार्केट कॅपमध्येही घसरण पाहायला मिळाली. यामुळे बँकेचं मार्केट कॅप ३.१९ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. तसेच या बँकेने देशातील चौथ्या मोठ्या बँकेचा दर्जा गमावला आहे. तर आता देशात अॅक्सिस बँक ही देशात चौथी ठरली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top