आता कोस्टल रोड वांद्रे सी- लिंकला जोडणार! वरळी ते वांद्रे थेट प्रवास

मुंबई – मुंबईकरांचा प्रवास आणखी सुसाट करण्यासाठी मुंबई महापालिका आता कोस्टल रोड वांद्रे-वरळी सी लिंकला जोडणार आहे. त्यासाठी उद्या १६ किंवा १७ एप्रिल रोजी १३६ मीटर लांबीचा आणि दोन हजार मेट्रिक टन वजनाचा गर्डर सी-लिंकला बसविला जाणार आहे.हा गर्डर माझगाव डॉक न्हावा जेट्टीवरून काल मुंबईच्या दिशेने रवाना झाला.

प्रियदर्शनी पार्क ते वरळी या कोस्टल रोडच्या उत्तरेकडील बाजूने वांद्रे सी-लिंकला जोडला जाणार आहे.
त्यासाठी देशातील सर्वाधिक वजनाचा गर्डर बसवण्यात येणार आहे.यासंदर्भात कोस्टल रोडचे उपमुख्य अभियंता एम.एम. स्वामी यांनी सांगितले की, ४६ मीटर, ४४ मीटर आणि ६० मीटरचे तीन गर्डर याआधीच पुलाच्या बांधणीसाठी बसविण्यात आले आहेत. त्यानंतर आता काल न्हावा गावाच्या जेट्टीवर२ हजार
१३६ मीटरच्या बो स्ट्रिंग पुलाची कमान बार्जमध्ये लोड येऊन वरळीच्या दिशेने ही बार्ज मार्गस्थ झाली. साधारण उद्या १६ एप्रिल रोजी वरळीपर्यंत ही बार्ज पोहोचेल. त्यानंतर हवामानाच्या परिस्थितीनुसार १६ किंवा १७ एप्रिलला हा गर्डर बसविला जाईल.कोस्टल रोडचे वरळीचे टोक आणि दक्षिणेकडील सी लिंक व उत्तरेकडील बाजूची कमान हे अंतर भरुन काढण्यासाठी आठ गर्डर लाँच करण्यात आले आहेत.या गर्डरमुळे पुलाचे आयुष्य १०० वर्षे होणार आहे. २५ ते ३० वर्षे त्याला गंज पकडत नाही.
कोस्टल रोड आणि सी लिंक या दरम्यान तयार होणाऱ्या पुलाचे अंतर ८५० मीटर रुंद आणि २७० मीटर रुंद असे असून पुलासाठी वापरला जाणारा धातू हा स्टीलचा असणार आहे. पुलाच्या एकूण गर्डरपैकी चार गर्डर याआधीच लाँच करण्यात आले आहेत.त्यामुळे आता वांद्रे येथून दक्षिण मुंबईत येणाऱ्या वाहनांना सध्याच्या सी लिंक वरळीला जिथे संपतो तिथे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top