आता पाकिस्तानात नोटाबंदी ? नव्या चलनी नोटा जारी करणार

इस्लामाबाद- भारतात मोठ्या प्रमाणात बनावट नोटा पाठवणारा पाकिस्तान सध्या रोखीच्या तुटवड्यामुळे त्रस्त आहे.आता या संकटाचा सामना करण्यासाठी पाकिस्तान नोटा बंदी करणार आहे.या पार्श्‍वभूमीवर सेंट्रल बँक ऑफ पाकिस्तानने नव्या चलनी नोटा जारी करणार असल्याची घोषणा केली आहे.

पाकिस्तानच्या सेंट्रल बँकेने रोख टंचाई आणि बनावट चलनाच्या धोक्याचा सामना करण्यासाठी प्रगत सुरक्षा तंत्रज्ञानाने सुसज्ज नवीन नोटा जारी करण्याची घोषणा केली आहे.स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचे गव्हर्नर जमील अहमद म्हणाले की, नवीन नोटा आंतरराष्ट्रीय प्रगत सुरक्षा तंत्रज्ञानाने सुसज्ज असतील. पाकिस्तानी चलनाचे आधुनिकीकरण करण्यासाठी ते युनिक सिक्युरिटी नंबर आणि डिझाईन वापरणार आहे. पाकिस्तानात महागाईने हाहाकार माजविला आहे. सामान्य माणसाला दोन वेळचे जेवण मिळणे कठिण झाले आहे.महागाई नियंत्रणाबाहेर गेली आहे.हा ५८ वर्षांतील उच्चांक आहे. अशातच नव्या नोटा जारी करण्याच्या निर्णयावर पाकिस्तान अर्थतज्ज्ञांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. बनावट नोटा आणि काळ्या पैशाच्या बाजार समस्येला तोंड देण्यासाठी नवीन चलनासोबतच ५००० रुपये किंवा त्याहून अधिक मूल्याच्या नोटांचेही चलन रद्द केले जाऊ शकते का, असा सवाल त्यांनी केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top