इक्वाडोरमध्ये लाईव्ह शो दरम्यान बंदुकधाऱ्यांचा टीव्ही स्टुडिओवर हल्ला

१३ आरोपींना अटक

क्विटो

इक्वाडोरमध्ये एका टीव्ही शोच्या लाईव्ह प्रक्षेपणादरम्यान १३ बंदुकधारी अचानक एका वृत्तवाहिनीच्या स्टुडिओमध्ये घुसले. त्यांनी अँकर आणि स्टुडिओमधील इतर कर्मचाऱ्यांना धमकवायला सुरुवात केली. या घटनेवेळी वृत्तवाहिनीचे थेट प्रक्षेपण सुरु होते. या बंदुकधाऱ्यांवर दहशवादाचा आरोप लावण्यात आला असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती इक्वेडोर सरकारने दिली आहे.

लॅटीन अमेरिकन देश इक्वाडोरमध्ये ही काल ही घटना घडली. बंदुकधाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना फरशीवर झोपायला सांगितले. यावेळी बंदुकीच्या गोळ्यांचाही आवाज ऐकू आला. सर्वांनी शांत राहा नाही तर आम्ही बॉम्बू फेकू, अशी धमकीही आरोपींनी कर्मचाऱ्यांना दिली. हे आरोपी तोंडांवर काळा कपडा बांधून हातात बंदूक आणि स्फोटकांसह टीव्ही स्टुडिओमध्ये घुसले आणि धमकावण्यास सुरुवात केली. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण परसले होते. या घटनेचे सुमारे १५ मिनिटे थेट प्रक्षेपण सुरु होते.

वृत्तवाहिनीच्या बातम्या प्रमुख, अलिना मॅनरिक यांनी सांगितले की, जेव्हा मास्क घातलेल्या पुरुषांचा एक गट इमारतीत घुसला तेव्हा मी स्टुडिओसमोरील नियंत्रण कक्षात होती. त्यापैकी घुसखोरांपैकी एकाने माझ्या डोक्यावर बंदूक लावली आणि जमिनीवर बसण्यास सांगितले. तोपर्यंत घटनेचे थेट प्रक्षेपण केले जात होते, सुमारे १५ मिनिटे थेट प्रक्षेपण सुरु होते. पण त्यानंतर स्टेशनचा सिग्नल तुटला. इक्वाडोरच्या राष्ट्रीय पोलिस प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व मास्क घातलेल्या घुसखोरांना अटक करण्यात आली आहे. बंदूकधाऱ्यांकडून बंदुका आणि स्फोटके जप्त केली आहेत. इक्वाडोरमध्ये सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे टीव्ही स्टुडिओवर हल्ला झाला, तर दुसरीकडे रात्रीच इक्वाडोरमधील ७ पोलिसांचे अपहरण झाले आहे. इक्वाडोरमधील तुरुंगातून एक धोकादायक अंमली पदार्थ तस्कर जोस अडोल्फो मॅकियास उर्फ फिटो फरार झाला आहे. या घटनांमुळे संपूर्ण देश हादरला आहे. देशातील परिस्थिती लक्षात घेता राष्ट्राध्यक्ष डॅनियल नोबोआ यांनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top