ईडीच्या अधिकाऱ्याला लाच घेताना अटक

जयपूर – राजस्थान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज ईशान्येतील इंफाळ येथील सक्तवसुली संचालनालय विभागाचे (ईडी) अधिकारी नवल किशोर मीणा आणि त्यांचा सहकारी बाबुलाल मीना या दोघांना कथित १५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली. तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबी विभागाने ही कारवाई केली. अधिकारी नवल मीणा यांनी तक्रारदाराकडे चिट फंड प्रकरणात अटकेची कारवाई न करण्यासाठी १७ लाखांच्या लाचेची मागणी केली होती, असा दावा तक्रारदाराने केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top