उदय सामंत यांच्या भेटीनंतर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे

मुंबई

सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी आजपासून एसटी बंदची हाक दिली होती. मात्र, सदावर्ते यांची मंत्री उदय सामंत यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर हा संप सुरूच झाला नाही. या बैठकीत महत्वाच्या चार मुद्यांवर चर्चा करण्यात आली, असे उदय सामंत यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

याबाबत उदय सामंत म्हणाले, ‘या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने एसटी कष्टकरी जनसंघाकडून आंदोलन मागे घेण्याचा निर्णय झाला. सदावर्ते हे कष्टकरी जनसंघाचे पदाधिकारी आहेत. एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असेल त्यांना मदत करणे ही आमची भूमिका आहे. दिवाळीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत यासंदर्भातील बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.’ दरम्यान, दिवाळीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठकीचे आयोजन केले जाईल. कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होत असेल, तर ते संबंधित अधिकाऱ्याकडे दाद मागू शकतात, बोनस वाढवण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील आणि जाहिर करतील, २२०० नवीन गाड्या येतील, २०२५-२६ मध्ये २५०० इलेक्ट्रिक बस येतील, येत्या चार वर्षात एसटीत ९००० बस दाखल होतील, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top