उपमुख्यमंत्री फडणवीसांची मुंबादेवी मंदिरात स्वच्छता मोहिम

मुंबई :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी देशातील सर्व मंदिर परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवावे असे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या आवाहानाला प्रतिसाद देत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबादेवी मंदिर स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर , मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज मुंबादेवी मंदिर आणि परिसराची स्वछता केली.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदींनी सर्वांनाच स्वच्छतेचे आवाहन केले आहे. त्यामुळे सर्वांनी आपली श्रद्धास्थाने स्वच्छ ठेवावीत, लवकरच अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे त्यावळे मंदिरे स्वच्छ असावीत.आज आम्ही स्वच्छता मोहिमेत सहभागी झालो. आम्ही प्रतिकात्मक स्वच्छता केलेली आहे, यामुळे एक नवी अनुभूती देखील मिळाली. राज्यात सर्वच ठिकाणी स्वच्छता सुरू आहे. सर्वत्र उत्साह दिसत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top