उरणच्या बाजारात रेडीमेड मिनी गुढ्या विक्रीसाठी दाखल

उरण – आजकाल धावपळीच्या युगामध्ये साहित्याची जमवाजमव करून गुढी उभारण्यासाठी पुरेसा वेळही मिळणे कठिण झाले आहे. हीच परिस्थिती लक्षात घेऊन आता रेडीमेड छोट्या गुढ्या बाजारात विक्रीसाठी येऊ लागल्या आहेत.उरणच्या बाजारात अशा रेडीमेड मिनी गुढ्या दाखल झाल्या आहेत. ही मिनी गुढी खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे.

यंदा येत्या मंगळवार ९ एप्रिल रोजी गुढीपाडवा आहे.गुढी उभारून मराठी नववर्षाचे स्वागत करण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे. या पार्श्‍वभूमीवर उरणच्या बाजारात लहानांत लहान ६ इंचापासून २ फुटांपर्यंत मिनी गुढ्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या गुढ्या साधारण ८०, १२०, १४०, २०० आणि २५० रुपये अशा किंमतीत विकल्या जात आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top